बंगळुरु | 4 डिसेंबर 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील शेवटचा आणि पाचवा टी-20 सामना रविवारी झाला. या सामन्यात भारतीय संघाने सहा धावांनी विजय मिळवला. यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ४-१ अशी आघाडी घेतली. कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या संघाने जोरदार कामगिरी केली. या सामन्यातील टॉप मोमेंट्स जाणून घेऊ या…
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला दुसऱ्याच चेंडूवर जीवनदान मिळाले. त्यावेळी सूर्यकुमार एका धावेवर खेळत होता. परंतु त्याचा फायदा सूर्यकुमारला घेता आला नाही. पाच धावा करुन सूर्यकुमार बाद झाला. ड्वारशसच्या गोलंदाजीवर मॅक्डरमॉट याने त्याचा कॅच पकडला.
ऑस्ट्रेलियाचा बेन मॅक्डरमॉट याने 98 मीटर लांब षटकार ठोकला. या बॉलवर चेंडू टॉप एजवरुन बाउंड्रीचा बाहेर गेला. आवेश खानच्या शॉट पिच बॉलवर मॅक्डरमॉट याने पुढे येऊन शॉट मारला. बॉल मिड-विकेटवरुन स्टेडियमच्या छप्परवर गेला. मालिकेत सर्वात लांब षटकार ठोकण्याचा विक्रम भारताचा रिंकू याच्या नावावर आहे. त्याने चौथ्या सामन्यात 100 मीटर लंब षटकार ठोकला आहे.
चौथ्या सामन्यानंतर पाचव्या सामन्यातही अंपायरला बॉल लागला. २० व्या षटकात अर्शदीप सिंह याच्या गोलंदाजीवर नाथन एलिस याने जोरदार शॉट मारला. बॉल सरळ अर्शदीपच्या दिशेने आली. त्याच्या हाताला स्पर्श होऊन बॉल फील्ड अंपायर अनंत पद्मनाभन यांना लागली. अर्शदीप याचा हात लागल्यामुळे बॉलचा वेग कमी झाला होता. यामुळे अंपायरला मोठी दुखापत झाली नाही.
अर्शदीप याचे शेवटचे षटक महत्वाचे ठरले. या षटकात ऑस्ट्रेलियाला सहा चेंडूत दहा धावांची गरज होती. अर्शदीप यांने मॅथ्यू वेड याला पहिला चेंडू बाऊंसर टाकला. दुसरा चेंडू यॉर्कर टाकला. तिसऱ्या चेंडूवर वेड बाद झाला. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्य चेंडूवर एक-एक धाव करण्यात आली. यामुळे भारताने हा सामना सहा धावांनी जिंकला.