T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात पूर्णपणे अपयशी होत असल्याचं दिसून येत आहे. संघात अव्वल दर्जाचे खेळाडू असतानाही भारताला सलग दोन सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळालं आहे. ज्यामुळे सर्वचजण भारतीय संघावर टीका करत असून दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहीरने संघनिवडीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
ताहिरच्या मते कोणत्याही सामन्यात लेग स्पिनर गोलंदाजीने सामना पलटू शकतात आणि भारताकडे असाच एक उत्कृष्ट लेग स्पीनर युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) असतानाही त्याला विश्वचषकासाठीच्या संघात सामिल न करणं आश्चर्यकारक आहे. ताहिर मीडियाशी बोलत असताना म्हणाला,‘चहल एक शानदार गोलंदाजा आहे. मी स्वत: त्याला विश्वचषकात पाहू इच्छित होतो. पण दुर्देवाने असं झालं नाही. पुढे ताहीर म्हणाला ‘लेग स्पिनर विविधप्रकारे गोलंदाजी करु शकतो. तो गुगली, लेग ब्रेक, टॉप स्पिनर, फ्लिपर आणि स्लाइडर असे पाच प्रकारचे चेंडू फेकू शकतो. असं असताना भारताच्या संघ निवडीचा निर्णय चकीत करणारा होता.’
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर संघ निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया आपल्या चुका सुधारून विजयासह पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. तसेच, त्यांचे टीम कॉम्बिनेश सुधारेल असेही वाटत होते. पण विराट कोहलीने किवी संघाविरुद्ध घेतलेल्या निर्णयांनी सर्वांनाच चकित केले. याचा परिणाम असा झाला की, भारताचा आठ विकेट्सनी पराभव झाला आणि ICC T20 विश्वचषक-2021 च्या उपांत्य फेरीतील संघाचा मार्ग कठीण झाला आहे. संघात जे बदल करण्यात आले त्यात रोहित शर्माला सलामीला न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या जागी ईशान किशनला केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करण्यास पाठवण्यात आले. यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर संतापले आहेत.
स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना गावस्कर म्हणाले की, किशनसारख्या युवा खेळाडूला सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी द्यायला नको होती. किशनला त्याचा मुंबई इंडियन्समधला सहकारी ट्रेंट बोल्टने बाद केले. त्याला आठ चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. गावसकर म्हणाले, “मला माहित नाही की ही अपयशाची भीती होती की अजून काहीतरी, पण त्यांनी फलंदाजीत केलेले बदल कामी आले नाहीत. रोहित शर्मा हा दिग्गज फलंदाज असून त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. कोहली स्वतः चौथ्या क्रमांकावर आला. किशनसारख्या युवा खेळाडूवर सलामीची जबाबदारी देण्यात आली.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?
(Imran tahir shocked after yuzvendra chahal not named in team india squad for t20 world cup 2021)