मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. याठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळवले गेले. ज्यामध्ये भारतीय महिलांनी मालिका 2-1 च्या फरकाने गमावली. आता या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात झाली असून आज (30 सप्टेंबर) पहिल्या दिवशी भारताने प्रथम फलंदाजी करत एक चांगली सुरुवात केली. भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) तिच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी करत नाबाद 80 धावा पहिल्या दिवशी केल्या आहे. दरम्यान पावसामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला असला तरी भारताने पहिल्या दिवशीच्या अखेरीस एक विकेटच्या बदल्यात 132 धावा केल्या आहेत.
सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. पण भारताची सलीमीवीर मंधानाने शेफालीसह मिळून एक संयमी खेळी खेळत उत्तम सुरुवात केली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची सलामीवीर शेफालीने दरवेळीप्रमाणे आक्रमक खेळी न करता संयमी खेळी करत 64 चेंडूत 31 धावा केल्या. तर स्मृतीने आक्रमक खेळीसह उत्तम फलंदाजी केली. पण 26 व्यो ओव्हरमध्ये शेफाली बाद झाल्यानंतर स्मृतीने सावकाश खेळ करत पुनम राऊतसह भारताचा डाव पुढे नेला. पण पावसाच्या व्यत्ययामुळे 45 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सामना थांबवण्यात आला आहे. पण सद्यस्थितीला तरी भारत मजबूत स्थितीत आहे. 30 सप्टेंबरला सुरु झालेला हा सामना 3 ऑक्टोबरपर्यंत खेळवण्यात येणार आहे.
It’s Stumps on Day 1 of the #AUSvIND #PinkBallTest
Bad weather ?️ makes its presence felt as #TeamIndia ?? end Day 1️⃣ at 132/1
Join us for Day 2️⃣ tomorrow ????
Scorecard ? https://t.co/seh1NVa8gu pic.twitter.com/X7YqiCWmaA
— BCCI Women (@BCCIWomen) September 30, 2021
भारताची सलामीवीर स्मृती मंधानाने सामन्यात तिच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट खेळी खेळली आहे. सध्या ती नाबाद 80 धावांवर खेळत आहे. विशेष म्हणजे स्मृतीने सुरुवातीचे 50 रन वेगात केले. पण नंतरचे केवळ 14 रन करण्यासाठी तब्बल 64 चेंडू घेतले. तिने आतापर्यंत 144 चेेंडूत 15 चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद 80 रन ठोकले आहेत.
भारतासाठी ही एक ऐतिहासिक टेस्ट मॅच आहे. कारण भारतीय महिला प्रथमच डे-नाइट टेस्ट मॅच खेळत आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध तब्बल 15 वर्षानंतर कसोटी सामना खेळत आहे. याआधी दोन्ही संघानी 2006 मध्ये एडिलेड येथे टेस्ट मॅच खेळली होती. ज्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला होता.
हे ही वाचा
IPL 2021 : मॉर्गनसोबतच्या वादावर आर. अश्विनचं सडेतोड उत्तर, टीकाकारांची पोलखोल करत केली बोलती बंद
IPL 2021: विराटसेना सूसाट! मॅक्सवेलचं दमदार अर्धशतक, राजस्थानवर 7 गडी राखून विजय
(In AUSW vs INDW 1st Test indian smriti mandhana shines with half century but rain stop play before time)