एका ओव्हरमध्ये 6,6,6,6,6,6 भारतातला नवीन युवराज सिंह, पण त्याच्या टीमची काय अवस्था? VIDEO

| Updated on: Feb 22, 2024 | 9:08 AM

त्याने टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंहसारखे एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले. युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा केला होता. वमशी कृष्णाने देशांतर्गत मॅचमध्ये ही कामगिरी केली. त्याने 10 सिक्स आणि 9 फोर मारले. म्हणजे 19 चेंडूत 96 धावा केल्या.

एका ओव्हरमध्ये 6,6,6,6,6,6 भारतातला नवीन युवराज सिंह, पण त्याच्या टीमची काय अवस्था? VIDEO
One over 6 sixes
Image Credit source: screengrab
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील युवा पिढीच आक्रमक फलंदाजीला प्राधान्य आहे. मग, भले फॉर्मेट कुठलाही असो. टेस्ट क्रिकेटमध्ये युवा ओपनर यशस्वी जैस्वाल आणि सरफराज खान सारख्या फलंदाजांनी आक्रमक बॅटिंग केली. त्यांच्यासारखच देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवा फलंदाज टेस्ट फॉर्मेटमध्ये धमाकेदार फलंदाजीचा प्रयत्न करतायत. आंध्र प्रदेशचा फलंदाज वमशी कृष्णाने असच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. त्याने टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंहसारखे एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले. युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा केला होता. वमशी कृष्णाने देशांतर्गत मॅचमध्ये ही कामगिरी केली.

बीसीसीआयच्या अंडर-23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी स्पर्धेत आंध्र प्रदेश आणि रेल्वेमध्ये सामना झाला. टेस्ट क्रिकेटचा फॉर्मेट असलेल्या या स्पर्धेत आंध्र प्रदेशचा सलामीवीर कृष्णाने T20 सारखी तुफान बॅटिंग केली. त्याने रेल्वेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. वमशी कृष्णाने पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावलं. त्याने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारल्या. रेल्वेचा लेग स्पिनर दमनदीप सिंहच्या गोलंदाजीवर कृष्णाने सहा चेंडूत सहा षटकार मारले. वमशी कृष्णाने या ओव्हरमधील प्रत्येक चेंडूवर सीमा रेषेपार थेट 6 धावा वसूल केल्या. त्याने 6 चेंडूत 6 सिक्स मारण्याची दुर्मिळ कामगिरी केली. कृष्णाने 64 चेंडूत 110 धावांची स्फोटक खेळी केली. यात 10 सिक्स आणि 9 फोर आहेत. म्हणजे 19 चेंडूत 96 धावा केल्या.


6 सिक्स मारणाऱ्या कृष्णाच्या टीमची अवस्था काय?

कृष्णाच्या या दमदार प्रदर्शनानंतरही आंध्र प्रदेशच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 378 धावा केल्या. या उलट रेल्वने पहिल्या डावात डोंगराएवढी धावसंख्या उभारली होती. त्यांनी 9 विकेट गमावून 865 धावा केल्या होत्या. रेल्वेकडून अंश यादवने 268 आणि रवी सिंहने 258 धावा केल्या होत्या. रेल्वेने पहिल्या डावाच्या आधारावर आंध्र प्रदेशवर 487 धावांची आघाडी मिळवली होती. हा सामना ड्रॉ झाला.