लंडन : मागील काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये अनेक बदल झाले आहेत. सध्या धडाकेबाज खेळी करुन फटाफट धावा करण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यात बहुतांशी लीगही 20 ओव्हरच्याच असल्याने त्यात तुफान फलंदाजी करणेच गरजेचे असते. पण मागील वर्षभरात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यामुळे पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटबद्दल क्रिकेटप्रेमींच्या मनात आवड निर्माण झाली आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांना कसोटी मालिकेत संयमी खेळी करुनच मात दिली होती. अशाच एक दर्जेदार संयमी खेळी पुन्हा एकदा इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये दिसून आली.
दक्षिण आफ्रीकेचा माजी दिग्गज फलंदाज हाशिम अम्ला (Hashim Amla) याने इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये (County Championship) सरे आणि हँपशर यांच्यात साऊदम्पटनच्या मैदानात सुरु असलेल्या सामन्यात अप्रतिम चिवट खेळीचे दर्शन घडवले. हँपशर संघाने पहिल्या डावांत 488 धावा केल्या. त्याच्या प्रतित्यूरात सरेचा संघ 72 धावांवर ऑलआऊट झाला. सरेला फॉलोऑन खेळावा लागला आणि त्यांचा पराभव निश्चित होता. पण हाशिम अम्लाच्या अप्रतिम फलंदाजीला इतरांनी साथ देत दुसऱ्या दिवशी मॅच संपवण्याजागी ओव्हर्स खेळून काढल्या. ज्यामुळे अखेर सामना ड्रॉ झाला.
टेस्ट क्रिकेटमध्ये मोठ्या धावसंख्येसाठी प्रसिद्ध हाशिम अम्लाने संपूर् आंतरराष्ट्रीय अनुभव या सामन्यात वापरला आणि 9 ओव्हरमध्ये 6 धावांवर 2 विकेट्स पडल्या असताना हाशिम क्रिजवर टिकून राहिला आणि दिवसभर फलंदाजी करुन 278 चेंडूत केवळ 37 रन करत चिवट फलंदाजी केली. त्याने 5 चौकार देखील लगावले. शेवटपर्यंत नाबाद रहात हाशिमने सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले
या सामन्यात हाशिमसोबत इतर फलंदाजानी देखील आपल्या परीने प्रयत्नांची शिकस्त करत संयमी फलंदाजी केली. त्यामुळे सरे संघाने तब्बल 104.5 ओव्हरपर्यंत फलंदाजी केली. ज्यात त्यांनी केवळ 122 दावा केल्या. विशेष म्हणजे 63 ओव्हरतर मेडन पडल्या.
हे ही वाचा :
कधी अर्धशतकाहून अधिक धावा न करणाऱ्या खेळाडूने ठोकलं दुहेरी शतक, भारतीय संघावर मिळवला दमदार विजय
भारत विरुद्ध श्रीलंका सामने सुरु होण्याआधीच ‘या’ खेळाडूचे निलंबन, लाखो रुपयांचा दंड ठोठावत कारवाई
IND vs ENG : भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू परतणार, बीसीसीआयकडून परतीचे आदेश
(In Country Championship Match Hashim Amla Did Top Class Slow Batting With 37 in 278 balls)