IPL 2021: आयपीएलच्या 14 व्या पर्वाच्या अंतिम सामन्यात चेन्नईचा संघ पोहचला असून दुसरा संघ कोणता? या प्रश्नाचं उत्तरही आता काही वेळात मिळणार आहे. केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु असून दिल्लीची फलंदाजी झाली आहे. तर केकेआर फलंदाजी करत आहे. पण दिल्लीच्या फलंदाजीवेळी एक अजब घटना घडली. दिल्लीचा बाद झालेला फलंदाज शिमरॉन हीटमायरला पंचानी पुन्हा मैदानात बोलावून घेतलं.
तर यावेळी नेमकं झालं, शिमरॉन त्याच्या नेहमीच्या अंदाजाच फलंदाजी करत होता. त्याने चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर उंच फटका मारल्यानंतर शुभमन गिलनं त्याचा झेल घेतला. त्यामुळे तो बाद म्हणून तंबूत परतला. पण तेव्हाच तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू बघताट संबधित बॉल नो असल्याचं स्पष्ट झालं आणि सीमेवर असलेल्या पंच अनिल यांनी त्याला पुन्हा मैदानात बोलावून घेतलं. त्यानंतर काही वेळातच तो बाद झाला. ज्यानंतर श्रेयसने काही धावा करत केकेआरसमोर 136 धावांचं आव्हान ठेवलं.
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी निवडली. त्यामुळे दिल्लीच्या खेळाडूंनी प्रथम फलंदाजी केली. पण संघातील सर्वच खेळाडू केकेआरच्या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर गारद झाले. ज्यामुळे ते केवळ 135 धावाच करु शकले आहेत. यामध्येही शिखरने सर्वाधिक 38 तर अय्यरने नाबाद 30 धावा केल्या. य़ाशिवाय शॉ आणि स्टॉयनीसने प्रत्येकी 18 तरल हीटमायरने 17 धावा केल्या. केकेआरकडून मिस्ट्री स्पीनर चक्रवर्तीने 2 तर मावी आणि फर्ग्यूसनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
इतर बातम्या
IPL 2021: सनरायजर्स हैद्राबाद वाईट वर्तवणूकीनंतरही डेव्हिड वॉर्नरला संघासोबत खेळायचंय, म्हणाला…
‘विराट कोहली एक अपयशी कर्णधार’, आरसीबीच्या पराभवानंतर मायकल वॉन पुन्हा बरळला
RCB Captiancy: ‘विराट कर्णधार म्हणून अपयशीच’, 3 देशांच्या 4 दिग्गज क्रिकेटपटूंचे टीकास्त्र
(In DC vs KKR Qualifier 2 shimron hetmyer called back by Umpire because Varun chakaravarthy throwes no ball)