T20 Cricket World Cup 2021: मागील काही वर्षात क्रिकेट या खेळात अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीला कसोटी क्रिकेट सर्वांचा आवडता प्रकार होता. पण आता टी20 क्रिकेटचं सर्व जग वेडं आहे. जसा प्रकार बदलला तसा खेळ खेळण्याची पद्धतही बदलली. आता फलंदाज विविध प्रकारचे क्रिकेटींग शॉट्स खेळत असतात. यात मागील दिशेने मारण्यात येणारे शॉट्स म्हणजे आधुनिक क्रिकेटची ओळख. त्यातही दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलीयर्स हा तर हे शॉट खेळण्यात तरबेज. दरम्यान इंग्लंड विरुद्ध बांंग्लादेश (England vs bangladesh) सामन्यातही एबीप्रमाणे बांग्लादेशचा मेहदी हसन यानेही स्कूप शॉट अर्थात मागच्या दिशेने चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला. पण तो यात अयशस्वी झाला.
तर सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांग्लादेश संघाचे सर्वच फलंदाद अपयशी ठरत होते. बांग्लेदशकडून मुशफिकूर रहिम याने केवळ 29 इतक्याच सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याचवेळी 17 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर मेहदी याने इंग्लंडच्या टाईमल मिल्स याला स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी चेंडू मागे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ख्रिस वोक्सच्या हातात गेल्याने मेहदी बाद झाला. त्यामुळे एबीसारखा शॉट खेळणं त्याला महाग पडलं आणि तो केवळ 11 धावा करुन बाद झाला.
अबुधाबीच्या शेख जायद मैदानात पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. पण हा निर्णय़ इंग्लंडच्या बोलर्सनी साफ चूकीचा ठरवत बांग्लादेशला अवघ्या 124 धावांवर रोखलं. बांग्लेदशकडून मुशफिकूर रहिम याने केवळ 29 इतक्याच सर्वाधिक धावा केल्या. पण इंग्लंडकडून मात्र अनुभवी टायमल मिल्सने उत्कृष्ट अशा 3 विकेट्स मिळवल्या. तर लिव्हिंगस्टन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर ख्रिस वोक्सनेही एक विकेट घेतली. त्यामुळे अवघ्या 124 धावांवर बांग्लादेशचा डाव आटोपला.
त्यानंतर अवघ्या 125 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघाने सुरुवातच जबरदस्त केली. सलामीवीर जेसन रॉयने 38 चेंडूत 61 धावा करत विजयाच मोलाचं योगदान दिलं. त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर बटलरने 18, डेविड मलानने नाबाद 28 आणि जॉनी बेयरस्टोवने नाबाद 8 धावा करत संघाचा विजय पक्का केला.
सुपर 12 चे दोन ग्रुप असून ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. यामध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाने 1 पैकी 1 सामना जिंकत अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळवलं आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकने 2 पैकी 1 सामना जिंकत चौथं स्थान मिळवलं आहे. दोन्ही सामने पराभूत होत बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.
हे ही वाचा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित
T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!
(In England vs Bangladesh match bangladesh Mehidy hasan tries to play scoop shot and caught out)