मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे आधी भारतात होणारा आयसीसी टी-20 विश्व विश्वचषक (ICC T20 World Cup 2021) आता युएईत पार पडणार आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएई आणि ओमन या देशांमधील मैदानात खेळवली जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) दिली होती. त्यावेळी या भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही संघ एकाच गटात असल्याने यांचा सामना नेमका कधी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर या सामन्याची तारीख आयसीसीने नुकतीच जाहीर केली आहे.
आयसीसीने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीत सुपर-12 फेरीतील दोन ग्रुप तयार करण्यात आले होते. यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोघेही ग्रुप-2 मध्ये आहेत. या दोघांसोबत ग्रुपमध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही होते. आता प्रत्येक गटाचे सामने कधी कोणासोबत असणार हे जाहीर केल्यानंतर. ग्रुप 2 ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान आहे, त्यांचा सामना 24 ऑक्टोबर, 2021 रोजी दुबईच्या मैदानात खेळवला जाणार आहे. ग्रुप 2 मधील सामन्यांची सुरुवातच या भव्य सामन्याने होणार आहे.
Mark your calendars ?
Get ready for the 2021 ICC Men’s #T20WorldCup bonanza ?
— ICC (@ICC) August 17, 2021
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
संबंधित बातम्या
(In ICC T20 World Cup India to play Pakistan in Dubai on October 24)