साऊथॅम्प्टन : पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्याला (WTC Final 2021) अखेर शनिवारी दुपारी सुरुवात झाली. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करुन दिली. 50 धावांची भागिदारी रचत एक दिलासादायक सुरुवात भारताला करुन देताला युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) गंभीर दुखापतग्रस्त होता होता वाचला. न्यूझीलंडचा खतरनाक गोलंदाज कायल जॅमीन्सनचा (Kyle Jamieson) एक बाउन्सर प्रचंज जोरात शुभमनच्या हेल्मेटवर आदळला. हा चेंडू इतका जोरात होता की शुभमन जागीच हालला. (In ICC WTC Final 2021 Shubman Gill Hit by Kyle Jamieson bouncer on Helmet In IND vs NZ Match)
प्रचंडगतीने बॉल आदळल्याने शुभमनला फिजिओची मदत घ्यावी लागली. हॅल्मेट असल्यामुळे शुभमनला दुखापत झाली नसली तरी काळजी म्हणून त्वरीत फिजिओने मैदानावर येऊन शुभमनची तपासणी केली. फिजिओने तपासल्यानंतर शुभमनने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली. 17 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली असून इंग्लंडच्या सध्याच्या वातावरणात खेळपट्टीवर बॉल मोठ्या प्रमाणात स्वींग होत होती, ज्यामुळे जॅमिन्सनचे बॉल खेळने फलंदाजाना अवघड झाले होते.
भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन देण्यासाठी शुभमनने हिटॅमन रोहितसोबत उत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन दिले. ज्यामुळे दोघांनी मिळून संघाला 50 धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दोघांनी संयमी फलंदाजी करत काही चौकारांच्या मदतीने या धावा केल्या. मात्र 34 धावां केल्यावर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर 62 धावांवर ही भागिदारी तुटली. त्यानंतर शुभमनही 28 धावा करुन बाद झाला.
#TeamIndia openers have got off to a great start here in the final of the #WTC21.
50-run partnership comes up between @ImRo45 & @RealShubmanGill ??
Follow the game here – https://t.co/tSsZ2pr0xm pic.twitter.com/VzU9NcKBoq
— BCCI (@BCCI) June 19, 2021
हे ही वाचा :
Ind vs NZ : पहिल्या दिवसाचा खेळ रद्द् झाल्यावर, खेळाडू रंगले ‘या’ खेळात, पाहा व्हिडीओ
WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?
(In ICC WTC Final 2021 Shubman Gill Hit by Kyle Jamieson bouncer on Helmet In IND vs NZ Match)