साऊथॅम्प्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) भारताचा डाव सावरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या रहाणेला अर्धशकापासून 1 धाव दूर असताना न्यूझीलंडच्या संघाने बाद केलं. पण ही विकेट न्य़ूझीलंडला सहजासहजी मिळाली नव्हती, त्यासाठी त्यांनी एक खास प्लॅन तयार केला होता. ज्यात दुर्देवाने रहाणेही फसला आणि एका उत्कृष्ठ संयमी खेळीचा शेवट झाला. (In ICC WTC Final New Zealand Got Indias Ajinkya Rahane Wicket With Perfect Plan)
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे 100 हून अधिक बॉल खेळला होता. बराच काळ क्रिजवर असणाऱ्या रहाणने 46 धावांवर असताना स्केवर लेगला एक उत्कृष्ट शॉट खेळत 3 धावा केल्या. ज्यानंतर तो केवळ 1 धाव दूर होता आपल्या अर्धशतपासून त्याच वेळी रहाणे हात खोलतो आहे हे कळताच न्यूझीलंडने स्केवर लेगला आणखी एक खेळाडू ठेवत तब्बल पाच खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी ठेवले. त्यानंतरच्याच नील वॅगनरच्या बॉलवर रहाणेने पुन्हा पुल शॉट खेळला जो थेट लॅथम याच्या हातात गेला आणि रहाणे बाद झाला.
रहाणे जरी न्यूझीलंडच्या जाळ्यात अडकला असला तरी त्याने एक उपकर्णधार म्हणून केलेली खेळी नक्कीच उल्लेखणीय होती. काही वेळातच दोन सेट सलामीवीरांनंतर पुजारा सारखा खेळाडू बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराच सोबत रहाणेने संयमी खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. काही प्रमाणात त्यात त्याला यशही आलं. मात्र अखेर अर्धशतकापासून 1 धाव दूर असताना रहाणे बाद झाला. त्याने 117 बॉल्समध्ये 49 धावा केल्या ज्यात 5 चौकारांचा समावेश होता.
#TeamIndia vice-captain batted with a lot of grit and gumption.
He departs after scoring 49 off 117 deliveries.
Live – https://t.co/CmrtWsugSK #WTC21 Final pic.twitter.com/7rlEi9ROXt
— BCCI (@BCCI) June 20, 2021
हे ही वाचा :
(In ICC WTC Final New Zealand Got Indias Ajinkya Rahane Wicket With Perfect Plan)