T20 World Cup 2021 : भारत आणि अफगाणिस्तान या सामन्याला आता काही वेळात सुरुवात होत आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली आहे. यावेळी भारतीय संघाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार सूर्यकुमारने पुन्हा एकदा संघात पुनरागमन केल्याने इशान किशन बेंचवर असणार आहे. तर अनुभवी आर आश्विन त्याचा यंदाच्या विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. त्यासाठी वरुण चक्रवर्तीला बेंचवर बसवलं आहे.
फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे मागील सामना खेळला नव्हता. पण आता तो फिट असल्याने पुन्हा एकदा मैदानात येईल. तर वरुण चक्रवर्तीच्या जागी आर आश्विनला संधी दिली आहे. आश्विनचा अनुभव भारताला विजय मिळवून देईल अशी आशा सर्वांना आहे.
? Team News ?
2⃣ changes for #TeamIndia as R Ashwin & Suryakumar Yadav are named in the team. #INDvAFG #T20WorldCup
Follow the match ▶️ https://t.co/42045c5J05
Here’s our Playing XI ? pic.twitter.com/QHICNk8Wjl
— BCCI (@BCCI) November 3, 2021
भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, रवीचंद्रन आश्विन, मोहम्मद शमी.
अफगाणिस्तान : हजरतुल्लाह झझाई, मोहम्मद शहजाद, रहमनउल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह जदरान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नाईब, राशिद खान, करीम जनत, एस. अश्रफ, हामिद हसन, नवीन उल् हक.
हे ही वाचा :
(In india vs afghanistan match afghanistan won the toss and elected to field first suryakumar and r ashwin in team know indias playing 11)