T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. जागतिक टी20 रँकिगमध्ये भारत चांगल्या क्रमांकावर असल्याने सुपर 12 मध्ये भारताचा समावेश आहे. दरम्यान सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून त्यात भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. पण तत्पूर्वी सराव म्हणून भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघासोबत भिडला. विषेश म्हणदे या दोन्ही सामन्यात भारताने दमदार प्रदर्शन करत विजयी पताका झळकावली आहे.
आधीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला 7 विकेट्सनी मात दिली. ज्यानंतर आज (20 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर तब्बल 9 गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात वरिष्ठ गोलंदाज नसतानाही संघाने अप्रतिम कामगिरी केली. विशेष म्हणजे या सामन्यात कर्णधार म्हणून रोहित शर्मा असताना विराटने सुरुवातीला विश्रांती घेण्याचा निर्णय़ घेतला होता. पण मध्यंतरी त्याने गोलंदाजी करत 2 ओव्हरही टाकल्या. केवळ 12 धावा विराटने दिल्या.
सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय गोलंदाजानी चांगलच जेरीस आणलं. विशेषत: फिरकीपटू आश्विन, जाडेजा आणि राहुल चाहरने उत्तम गोलंदाजी केली. यावेळी आश्विनने 2, जाडेजाने, चाहर आणि भुवनेश्वरने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून केवळ स्मिथने (57) अर्धशतक झळकावलं. तर स्टॉयनीस (42) आणि मॅक्सवेलने (37) त्याला चांगली साथ दिली. ज्य़ाच्या जोरावर त्यांनी 152 धावा करत भारतासमोर 153 धावांचे आव्हान ठेवले.
153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने सुरुवातच उत्तम केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलने दमदार फलंदाजी केली. 39 धावा करुन राहुल बाद झाल्यानंतरही रोहितने सूर्याबरोबर सामना पुढे नेला. त्यानंतर 60 धावा करुन रोहित स्वत:हून विश्रांती घेण्यासाठी तंबूत परतला. ज्यानंतर सूर्या आणि हार्दीकने अनुक्रमे 38 आणि 14 धावा करत विजय भारताच्या नावे केला.
2⃣ in 2⃣ for #TeamIndia! ???
India beat Australia and register their second win in a row in the warm-up games ??#INDvAUS #T20WorldCup pic.twitter.com/CKL9oK7yI6
— BCCI (@BCCI) October 20, 2021
इतर बातम्या
T20 World Cup मधील बांग्लादेशचं आव्हान कायम, ओमानवर 26 धावांनी विजय
T20 World Cup 2021: स्कॉटलंडच्या खेळाडूने भारतात घेतली स्पेशल ट्रेनिंग, विश्वचषकात रचला इतिहास
T20 World Cup मध्ये स्कॉटलंडच्या खेळासह जर्सीही फॅन्सना आवडली, 12 वर्षांची चिमुरडी आहे डिझायनर
(In India vs Australia T20 World Cups Warm up Match India Won match with 9 Wickets in Hands)