लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर दुसरा सामना भारताने जिंकला. त्यानंतर आता तिसरा कसोटी सामना लीड्स (Leeds) येथे 25 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी तर महत्त्वाचा असेलच पण भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. शर्मा आणि बुमराह या दोघांनाही महान खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांचा रेकॉर्ड तोडण्याची सुवर्णसंधी आहे.
आता तुम्ही विचार करत असाल एक फलंदाज आणि एक गोलंदाज कोणता रेकॉर्ड तोडणारा आहे. पण हा एक रेकॉर्ड नसून दोन वेगवेगळे रेकॉर्ड आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे अष्टपैलू असल्याने त्यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही प्रकारात अप्रतिम कामगिरी केली आहे. तर त्यांचे हे तुटू शकणारे दोन रेकॉर्डपैकी एक आहे, कसोटी क्रिकेटमधील षटकार ठोकण्याशी संबधित तर दुसरा आहे वेगवान 100 कसोटी विकेट्स घेण्याचा.
कपिलदेव यांनी 131 कसोटी सामन्यात 184 डावांत 2 हजार 831 धावा केल्या आहेत. ज्यात 61 षटकार त्यांनी ठोकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्यामध्ये सेहवाग, धोनी आणि सचिननंतर ते चौथ्या स्थानी आहेत. त्यानंतर पाचव्या स्थानी रोहित शर्मा असून त्याने 41 टेस्ट सामन्यांत 70 डावांत 61 षटकार ठोकवे आहेत. त्यामुळे आणखी एक षटकार ठोकताच तो कपिल देव यांच्या रेकॉर्डला मागे टाकून तो चौथ्या नंबरवर पोहोचेल.
कपिलदेव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवानगतीने 100 विकेट्स घेतल्या आहेत. सर्वात वेगवान गतीने ही कामगिरी करणारे ते प्रथम भारतीय आहेत. त्यांनी अवघ्या 25 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती. आता जसप्रीत बुमराहकडे हा रेकॉर्ड तोडण्याची सुवर्णसंधी आहे. तो 100 विकेटपासून केवळ 5 विकेट दूर आहे. बुमराहने आतापर्यंत 22 कसोटी सामन्यात 95 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे लीड्समधील तिसरे कसोटीत तो 5 विकेट घेताच सर्वाधिक गतीने 100 विकेट पूर्ण करणारा खेळाडू बनेल.
इतर बातम्या
इंग्लंड क्रिकेट इतिहासात आजचा दिवस मानला जातो ‘Unlucky’, ‘हे’ आहे त्यामागील कारण
भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच
(In india vs england 3rd test at leeds Rohit sharma and Jasprit bumrah can break kapil dev record)