India vs Sri Lanka: ‘या’ पाच श्रीलंकन खेळाडूंपासून भारताला सर्वाधिक धोका, योग्य रणनीती आखून सावध खेळ गरजेचा
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. भारताकेड नवखे पण तगडे क्रिकेटर असले तरी काही श्रीलंकन खेळाडूंकडून मोठा खतरा आहे.
1 / 5
श्रीलंका संघात भारतासाठी सर्वात पहिला धोका हा त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज मिनोद भानुका (Minod Bhanuka) ठरु शकतो. मागील काही काळापासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मिनोदने अप्रतिम खेळ दाखवला आहे. त्याने तिहरे शतकही ठोकले असून मर्यादीत ओव्हरच्या खेळात त्याचा खेळ जास्त खास नसला तरी भारतासाठी तो वरच्या फळीतील एक महत्त्वाची विकेट असणार आहे.
2 / 5
अशेन बैंडरा (Ashen bandera) याने नुकतीच वेस्टइंडीज संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटची सुरुवात केली. त्याने सुरुवातीला उत्कृष्ट खेळी करत सुरुवातीच्या सामन्यांमध्येच 50, 18 आणि नाबाद 55 धावांची खेळी केली. फिरकीपटूंविरुद्ध अशेनची खेळी अप्रतिम असल्याने भारतीय वेगवान गोलंदावर त्याला बाद करण्याची जबाबदारी अधिक असेल.
3 / 5
श्रीलंका संघातील एक अनुभवी खेळाडू भानुका राजपाक्षे (Bhanuka Rajpakshe) फिटनेसच्या कारणामुळे काही काळ संघातून बाहेर होता. मात्र भारताविरुद्ध तो संघात असल्याने त्याच्या खेळीवरही श्रीलंका संघाच भवितव्य ठरणार आहे. भारतीय गोलंदाजानाही लवकरात लवकर भानुकाची विकेट घेणे गरजेचे आहे.
4 / 5
मागील वर्षी धनंजय लक्षण (Dhanjay Laxan) श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम ऑलराउंड प्रदर्शन करणाऱ्या धनंजयकडूुनही भारतीय संघाला धोका असल्याने त्याच्याविरुद्ध योग्य रणनीती आखण्याची गरज आहे.
5 / 5
भारताविरुद्ध संघात स्थान देण्यात आलेला पातुम निसांका (Patum Nisanka) याने मागील दोन वर्षांत स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या अप्रतिम प्रदर्शनामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याने् फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 64.45 च्या सरासरीने 14 शतक ठोकले आहेत.