आयपीएल 2021 हे भारतीय गोलंदाजांसाठी खास ठरलं. यंदा सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजानाच पर्पल कॅपचा मान मिळाला. आऱसीबीचा हर्षल पटेल सुरुवातीपासून पर्पल कॅप स्वत:कडे घेऊन आहे. सध्याही त्याच्याकडेच ही टोपी असून त्यानंतर, आवेश आणि नंतर जसप्रीतचा नंबर लागतो. पण काही परेदेशी पाहुण्यांनी देखील बरेच विकेट घेतले. विशेष म्हणजे या खेळाडूंचे संघ गुणतालिकेत खाली असले तरी यांची नाव पर्पल कॅप यादीत अगदी वर होती.
यातील एक नाव म्हणजे राशिद खान. सनरायजर्स हैद्राबाद संघाचा दिग्गज फिरकीपटू राशिद खानने 14 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा संघ गुणतालिकेत सर्वात खाली असूनही तो मात्र टॉप गोलंदाजांमध्ये होता.
त्यानंतरचा खेळाडूही हैद्राबाद संघाचाच असून त्याच नाव आहे जेसन होल्डर. तो यंदा केवळ 8 सामनेच खेळला. पण या 8 सामन्यात त्याने 16 विकेट्,स घेतल्या.
यानंतरचं नाव म्हणजे राजस्थान रॉयल्सचा ख्रिस मॉरीस. यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ख्रिसने नावाला साजेसा खेळ तर केला नाही. पण राजस्थानसाठी 11 सामन्यात 15 विकेट्स घेतले. यातील 14 विकेट त्याने भारतात घेतले असून एकच युएईत घेतला.
या नंतरचा खेळाडूही राजस्थान संघाचाच असून तो म्हणजे बांग्लादेशचा मुस्तफिजूर रेहमान. रेहमाननेही उत्तम गोलंदाजी करत 14 सामन्यांत 14 विकेट्स घेतले.