IPL 2021: शुक्रवारी झालेल्या आयपीएलच्या साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 42 धावांनी मात करत मुंबई इंडियन्सनी (MI vs SRH) स्पर्धेचा शेवट गोड केला. अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मुंबईने मोठा विजय मिळवला. पण तरीदेखील नेट रनरेटच्या जोरावर केकेआर (KKR) मुंबईपेक्षा पुढे असल्याने मुंबई प्लेऑफमध्ये पोहचू शकली नाही.
दरम्यान तब्बल 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलेला संघ यंदा प्लेऑफमध्येही पोहचू शकला नसल्याने सर्वचजण चकीत आहेत. पण याला कारणही संघातीलच काही खेळाडू आहेत. अतिशय तगडा संघ असलेल्या मुंबईचे पाच महाऱथी यंदा खास फॉर्ममध्ये नसल्याने मुंबईला यंदा स्पर्धेतून इतक्या लवकर बाहेर पडावे लागले. हे पाच खेळाडू असे आहेत ज्यांनी मुंबईला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण यंदा त्यांना कमाल करता आलीच नाही.
1. रोहित शर्मा
या पाच खेळाडूंमध्ये सर्वात पहिलं नाव म्हणजे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). कर्णधार म्हणून अपयशी ठरलेला रोहित यंदा खास फलंदाजीही करु शकला नाही. त्याने 13 सामन्यात 29.30 च्या सरासराने 127.42 च्या स्ट्राइक रेटने 381 धावा केल्या. केवळ एकचं अर्धशतक ठोकले्या रोहितला संघाला प्लेऑफमध्ये घेऊन जाता आले नाही.
2. हार्दीक पंड्या
हार्दीक पंड्या (Hardik Pandya) हे या यादीतील दुसरं नाव आहे. संघाचा स्टार अष्टपैलू यंदा दुखापतीमुळे सतत ग्रस्त होता. त्यामुळे तो काही सामन्यांनाही हुकला. खेळला त्या सामन्यात 14.11 च्या सरासरीने 113.39 च्या स्ट्राइक रेटने 127 धावाचं केल्या. त्याने एकही ओव्हर यंदा गोलंदाजी केली नाही.
3. कृणाल पंड्या
संघातील दुसरा अष्टपैलू खेळाडू आणि हार्दीकचा भाऊ कृणाल पंड्याही (Krunal Pandya) यंदा खास कामगिरी करु शकला नाही. अनेकदा काही सामन्यांत संघाला विजय मिळवून देणाऱ्या कृणालने यंदा फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीमध्येही खास चमक दाखवली नाही. त्याने 13 सामन्यात 14.30 च्या सरासरीने आणि 116.26 च्या स्ट्राइक रेटने 143 धावा केल्या. तर 7.98 च्या इकॉनमी रेटने केवळ 5 विकेट घेतले.
4. कायरन पोलार्ड
संघाचा उपकर्णधार आणि दिग्गज खेळाडू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) हादेखील त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीने संघाला प्लेऑफमध्ये घेऊन जाऊ शकला नाही. त्याने 14 सामन्यात 30.62 च्या सरासरीने आणि 148.48 च्या स्ट्राइक रेटने 245 धावाचं केल्या. तर 7.21 च्या इकॉनमी रेटने केवळ 5 विकेटचं घेतल्या.
राहुल चाहर
या यादीत अखेरचं नाव संघाचा युवा फिरकीपटू राहुल चाहरचंही (Rahul Chahar) नाव आहे. त्याच्या फिरकीची जादू यंदा चालली नाही. त्याने 11 सामन्यात 24.46 च्या सरासरीने आणि 7.39 च्या इकॉनमी रेटने केवळ 13 विकेट्स घेतल्या. त्यात तो आगामी टी20 विश्वचषकासाठीही भारतीय संघात असल्याने बीसीसीआयच्या चिंतेतही वाढ झाली आहे.
हे ही वाचा :
IPL 2021: आरसीबीचा चित्तथरारक विजय, भरत-मॅक्सवेल जोडीची तुफान खेळी, दिल्लीवर 7 गडी राखून विजय
MI vs SRH: इशान किशन ON FIRE, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक, दिग्गजांना टाकलं मागे
(In IPL 2021 Mumbai Indians Star Players out of form let MI Out of Playoff)