IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगमधून दरवर्षी भारतीय क्रिकेटला नवनवे युवा क्रिकेटपटू भेटत असतात. यंदाही अशाच एक युवा गोलंदाजाने चमकदार कामगिरी करत सर्वांच लक्ष्य वेधून घेतलं आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघातून पदार्पण करणारा मूळचा काश्मीर येथील उम्रान मलिक (Umran Malik) सध्या चर्चेचा विषय आहे. अतिशय वेगवान आणि अचूक गोलंदाजी करणाऱ्या उम्रानने काही सामनेच खेळले असून यात खूप विकेट्स नसल्या मिळवल्या तरी वेगवान गोलंदाजीच्या जोरावर सर्वांच लक्ष्य वेधलं आहे. त्यामुळेच त्याला आगामी टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) भारतीय संघासोबत नेट बोलर म्हणून सामिल करण्यात आलं आहे.
हैद्राबाद संघाचा गोलंदाज टी नटराजनला कोरोनाची बाधा झाल्यामुळे संघात स्थान मिळालेल्या उम्रान मलिकने पहिल्याच सामन्यात एक रेकॉर्ड केला होता. उम्रान याने त्याच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर तब्बल 150 kmph वेगाने चेंडू फेकला. आय़पीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतका वेगवान चेंडू फेकता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 152.85 kmph वेगाने चेंडू टाकत उम्रानने यंदाच्या पर्वातील सर्वात वेगवान चेंडूचा रेकॉर्डही तोडला. त्यामुळे त्याला आता भारतीय संघासोबत सामिल होता येत आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार भारतीय निवडकर्त्यांनी ठरवल्याप्रमाणे भारतीय फलंदाजाना सराव देण्याकरता मुख्य गोलंदासह नेट गोलंदाजांनाही सोबत ठेवण्यात येणार आहे. BCCI च्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार “उम्रान भारतीय संघासोबत नेट बोलर म्हणून राहिल. त्याने IPL मध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्यासारख्या वेगवान गोलंदाजीच्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांना चांगला सराव होईल.”
सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे उम्रान मलिक याला टी नटराजनच्या जागी संघात घेण्यात आलं. उम्रान हा जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक टी20 आणि लिस्ट A सामने खेळले असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतले आहेत. तो सध्या सनरायजर्स हैद्राबाद संघाचा नेट बोलर म्हणून खेळत असताना आता त्याला संघातही स्थान मिळालं आहे.
क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत. भारताने संघ जाहीर केला असून माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघाचा मेन्टॉर म्हणून नेमण्यात आलं आहे. धोनीला हे पद सोपवत भारताने एक नवा डाव खेळला असून सर्वांचे लक्ष भारताच्या विश्वचषक कामगिरीकडे लागले आहे.
भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर
भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-
हे ही वाचा-
विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?
(In IPL 2021 SRH fast bowler Umran Malik added with indian team as Net bowler for ICC T20 World Cup)