दुबई : नुकताच भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा थरार संपला असून आता आयपीएलशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. आगामी आयपीएलमध्ये अर्थात IPL 2022 मध्ये 8 नव्हे तर 10 संघ खेळणार असल्याचं यापूर्वीच समोर आलं होतं. त्यानुसार दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाली आहे. या दोन संघासाठी अनेक दिग्गज व्यवसायिक आणि बड्या हस्तींमध्ये बोली लावण्यात आल्या आहेत. यापैकी अदानी ग्रुप, RPSG, हिंदुस्तान टाइम्स मीडिया, मँचेस्टर युनायटेड, रणवीर सिंगआणि अरुबिदों अशा काहींनी सर्वात महागड्या बोली लावल्या आहेत.
त्यानंतर आता RPSG अर्थात आरपी संजीव गोएन्का ग्रुप्स आणि सीवीसी कॅपिटल कंपनीने लिलाव जिंकला आहे. गोएन्का ग्रुपने लखनौचा संघ 7 हजार 90 कोटी रुपये तर सीवीसी कॅपिटल कंपनीने अहमदाबाद संघ 5 हजार 625 कोटींना लिलावात विकत घेतला आहे.
Ahmedabad and Lucknow to be the two new teams at Indian Premier League (IPL). CVC Capital Partners gets Ahmedabad while RPSG Group gets Lucknow. pic.twitter.com/0zmQS7nQEb
— ANI (@ANI) October 25, 2021
दुबईमध्ये झालेल्या या लिलावात तब्बल 12 हजार कोटींच्या घरात दोन्ही संघ विकत घेण्यात आले आहेत. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेडसारख्या बड्या कंपन्या आणि संघासह रणवीर सिंगसारखा अभिनेताही लिलाव प्रक्रियेत होता. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेड यांची बोली 5000 कोटींपर्यंतच पोहचली. तर संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.तर सीवीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाला जवळपास 5 हजार 625 कोटी रुपयांना लिलावात मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही संघासाठी मोजावी लागलेली किंमत तब्बल 12 हजार कोटींहूनही अधिक आहे.
How the #IPL bids went! pic.twitter.com/nLjQb6djsB
— Harsh Goenka (@hvgoenka) October 25, 2021
या लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने दोन्ही संघाची बेस प्राईज अर्थात सुरुवाती किंमत 2 हजार कोटी इतकी ठेवली होती. त्यानुसार सर्व उपस्थितांनी बोली लावण्यास सुरुवात केली. यावेळी अदानी ग्रुप, टॉरेंट आणि मँचेस्टर यूनाइटेड यांची बोली 5000 कोटींपर्यंतच पोहचली. तर संजीव गोएन्का ग्रुपने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लावत लखनौ संघ जवळपास 7 हजार 90 कोटी रुपयांना तर सीवीसी कॅपिटल या प्रायव्हेट इक्वीटी फर्म अहमदाबाद संघ जवळपास 5 हजार 625 कोटी रुपयांना लिलावात मिळवला आहे. याआधी सर्वात महाग संघ म्हटलं तर पुणे वॉरियर्स हा होता ज्याला सहारा ग्रुपने 370 मिलियन डॉलर इतकी असून मुंबईचा संघही 111.9 मिलियन डॉलरच्या घरात आहे. पण या दोन्ही संघाची किंमत यांच्यापेक्षाही अधिक आहे.
इतर बातम्या
India vs Pakistan : पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार असणाऱ्या शाहीनचं, शाहीद आफ्रिदीशी नातं काय?
इंग्लंड संघाची ताकद वाढणार, सर्वात बलाढ्य खेळाडू संघात परतणार
(In IPL 2022 Ahmedabad and Lucknow, teams newly joined, Ahmedabad owend by CVC Capital Company and RP Sanjiv Goenka Group gets Lucknow IPL franchise)