IPL 2023 : मुलासमोर 156.22 kmph वेगाने गोलंदाजी करणारा बॉलर येताच, आईने टीव्ही सोडून सुरु केली देवपूजा

| Updated on: Apr 09, 2023 | 2:48 PM

IPL 2023 : आईने देवघरात जाऊन मंत्र जप सुरु केला. या खेळाडूला आयपीएलपेक्षा देशात खेळल्या जाणाऱ्या तामिळनाडू प्रीमियर लीगमधून जास्त पैसा मिळतो.

IPL 2023 : मुलासमोर 156.22 kmph वेगाने गोलंदाजी करणारा बॉलर येताच, आईने टीव्ही सोडून सुरु केली देवपूजा
Sai Sudarshan
Image Credit source: instagram
Follow us on

IPL 2023 News : मागच्या सीजनमध्ये गुजरात टायटन्सने विजेतेपद मिळवलं. यंदाच्या सीजनमध्येही जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने गुजरात टायटन्सची टीम मैदानात उतरली आहे. गुजरातच्या टीमने यंदाच्या सीजनमध्ये दोन सामने खेळले आहेत. दोन्ही मॅचमध्ये त्यांनी विजय मिळवलाय. पहिल्या मॅचमध्ये गुजरातने चेन्नई सुपर किंग्स आणि दुसऱ्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरवलं.

दोन्ही मॅचमध्ये कॅप्टन हार्दिक पंड्याच्या एका खेळाडूने कमाल केली. साई सुदर्शनने सीएसके विरुद्ध 22 आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 62 धावा फटकावल्या. टीममध्ये साई सुदर्शनची एक वेगळी जागा आहे.

आयपीएलपेक्षा तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये मिळाला जास्त पैसा

आयपीएलआधी साई सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगलं प्रदर्शन केलय. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 3 सेंच्युरी आणि रणजी ट्रॉफीमध्ये 2 शतकं झळकावली आहेत. इतकच नाही, आयपीएलआधी तामिळनाडू प्रीमियर लीगच्या लिलावातील तो एक महागडा खेळाडू होता. लायका कोवई किंग्सने त्याला 21.6 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. गुजरात टायटन्सकडून मिळणाऱ्या सॅलरीपेक्षाही जास्त किंमत आहे.


टीव्हीचा आवाज बंद केला

गुजरात टायटन्सने सुदर्शनला 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसला विकत घेतलं होतं. आता हाच प्लेयर भल्या-भल्या गोलंदाजांवर भारी पडतोय. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, मागच्या सामन्यात सुदर्शनसमोर, 156.22 kmph वेगाने बॉलिंग करणारा एनरिक नॉर्खिया होता. त्यावेळी सुदर्शनच्या आई ऊषा यांनी टीव्हीचा आवाज बंद केला होता. आयपीएलमध्ये 155 kmph पेक्षा जास्त वेगाने बॉलिंग करणाऱ्या निवडक बॉलर्समध्ये नॉर्खियाचा समावेश होतो.

मंत्र जाप सुरु केला

नॉर्खियाने काही वर्षांपूर्वी राजस्थान रॉयल्स विरुद्ध 156.22 kmph वेगाने चेंडू टाकला होता. चालू सीजनमध्ये सुदर्शनसमोर नॉर्खिया होता, त्यावेळी त्याची आई देवघरात जाऊन देवपूजा करत होती. मंत्रोच्चार सुरु होते. सुदर्शनच्या वडिलांनी मॅच संपल्याची माहिती त्याच्या आईला दिली. सुदर्शनच्या आईने बऱ्याच काळापासून त्याची मॅच पाहिलेली नाही. मॅच पाहताना टेन्शन येतं. त्यामुळे त्या फक्त रिप्ले पाहतात.