चेन्नईत बांग्लादेशला चार दिवसात चित केल्यानंतर आता कानपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या आणि सीरीजच्या शेवटच्या कसोटी सामन्यावर लक्ष आहे. कानपूरमध्ये भारताचा रेकॉर्ड कसा आहे? विराट कोहलीच प्रदर्शन कसं आहे? कानपूर कसोटीत विराट कोहली 5 मोठे रेकॉर्ड मोडू शकतो का? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी कानपूर कसोटीशी संबंधित आकड्यांचा खेळ समजून घ्यावा लागेल. कानपूरमध्ये भारत आतापर्यंत 23 कसोटी सामने खेळलाय. यात 7 विजय आणि 3 पराभव आहेत. 13 कसोटी सामने ड्रॉ झालेत. बांग्लादेश विरुद्ध भारत इथे एकही कसोटी सामना खेळलेला नाही. पहिल्यांदा कानपूरमध्ये भारत-बांग्लादेश आमने-सामने असतील.
कानपूरमध्ये भारत जे 23 कसोटी सामने खेळलाय, त्यात किती सामन्यात विराट कोहली होता. याच उत्तर आहे, फक्त एक कसोटी सामना. कानपूरमध्ये विराट कोहली फक्त न्यूझीलंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळलाय. त्यात दोन्ही इनिंगमध्ये मिळून त्याने फक्त 27 धावा केल्या आहेत. विराटने तेव्हा पहिल्या इनिंगमध्ये 9 आणि दुसऱ्या डावात 18 धावा केल्या होत्या.
कानपूर कसोटीत विराटकडे कुठले 5 रेकॉर्ड तोडण्याची संधी
डॉन ब्रॅडम्रन यांच्या नावावर 29 कसोटी शतकं आहेत. सध्या विराट कोहलीच्या नावावर 29 कसोटी शतकं आहेत. कानपूरमध्ये शतक झळकवल्यास विराटकडे ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
फलंदाजीत विराट ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड मोडू शकतो, तर कॅचच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला पाठी टाकण्याची संधी आहे. सचिनने टेस्टमध्ये 115 कॅच घेतल्या आहेत. विराटच्या नावावर 113 कॅच आहेत. म्हणजे आणखी 3 कॅच पकडल्या तर विराट सचिनच्या पुढे निघून जाईल.
विराट कोहलीकडे कानपूर कसोटीत 600 पेक्षा कमी डावात 27 हजार इंटरनॅशनल धावा करणारा क्रिकेटर बनण्याची संधी आहे. विराट फक्त 35 धावा दूर आहे. हे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 623 इनिंगमध्ये या धावा केल्या आहेत.
विराट कोहलीकडे कसोटीत 1000 चौकार मारण्यााची संधी आहे. कानपूर कसोटीत 7 चौकार मारुन तो या रेकॉर्डला गवसणी घालू शकतो.
विराट कोहलीने कानपूर कसोटीत 129 धावा केल्या, तर टेस्ट क्रिकेटमध्ये 9000 धावा करणारा तो चौथा भारतीय बनेल. याआधी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी हा रेकॉर्ड केलाय.