पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यातही दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावलं आहे. यासोबत त्याने एका नव्या विक्रमाला गवासणी घातली आहे.
मोहम्मद रिजवानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याततील अर्धशतकासह यंदाच्या वर्षात 1000 टी20 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबरने एका वर्षात 826 धावा ठोकल्या होत्या.
क्रिकेटच्या इतिहासाचा विचार करता कसोटी क्रिकेटमध्ये 1902 साली क्लेम हिल यांनी एका वर्षात 1000 धावा ठोकल्या होत्या. तर 1983 मध्ये डेविड गावरने वनडेमध्ये एका वर्षात 1000 धावा केल्या आहेत.
मोहम्मद रिजवान आणि बाबर आजमने 21 डावांमध्ये 1240 धावा केल्या आहेत. दोघांनी 5 शतकीय भागिदारी केल्या आहेत.