मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेली आयपीएल 2021 (IPL 2021) पुन्हा सुरु करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने (BCCI) घेतला. यंदाच्या आयपीएलमधील 29 सामने भारतात झाले असून उर्वरीत 31 सामने युएईत (UAE) घेण्याचे बीसीसीआयने त्याच्या विशेष कार्यकारणी बैठकीत ठरवले. उर्वरीत आयपीएलच्या नियोजनात सध्या बीसीसीआय व्यस्त असताना सर्वात मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर परदेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळवण्याचा आहे. कारण सर्वात आधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Club) टी-20 विश्वचषक जवळ आला असल्याने खेळाडूंना आयपीएल खेळू देणार नसल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर इतरही देशांतून अशा प्रकारच्या मागण्या होऊ लागल्याने यंदा आय़पीएलमध्ये परदेशी खेळाडू खेळणार का नाही? हा प्रश्न निर्माण झाला ज्यानंतर आता बीसीसीआयने परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी कंबर कसली आहे. (In Remaining IPL 2021 All Foreign Players Should Play BCCI Trying All Possibilities)
आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांत परदेशी खेळाडू खेळावे यासाठी बीसीसीआय सर्व क्रिकेट बोर्डांशी संपर्क साधत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, ‘बीसीसीआयला दरवर्षी खेळणारे सर्व परदेशी खेळाडू यंदाही खेळावे असे वाटत असल्याने त्या दृष्टीने बीसीसीआय सर्व प्रयत्न करत आहे. त्यासाठी बीसीसीआय इतर क्रिकेट बोर्डाना आणि क्रिकेटपटूंना संपूर्ण सुरक्षा आणि काळजी घेतली जाईल असा विश्वास देण्याच्या प्रयत्नात आहे.’
आतापर्यंत आयपीएल 2021 मध्ये 29 सामने झाले असून उर्वरीत 31 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे या उर्वरीत 31 सामन्यांत 27 लीग गेम्स आणि 3 डबल हेडर सामने होतील. दरम्यान आतापर्यंत सूत्रांच्या माहितीनुसार 19 सप्टेंबरला स्पर्धा सुरु होऊ शकते. तर 15 ऑक्टोबरला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो.
दरम्यान मे महिन्याच्या सुरुवातीला आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने 3 मे रोजीचा RCB विरुद्ध KKR हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर 4 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे IPL ची स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय BCCI ने 4 मे रोजी घेतला होता.
संबंधित बातम्या
IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय
IPL Suspend : कोरोनाचा उद्रेक, BCCI ची मोठी घोषणा, आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित
(In Remaining IPL 2021 All Foreign Players Should Play BCCI Trying All Possibilities)