IPL 2021: यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) 49 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (SRH) या संघामध्ये झाला. यावेळी केकेआरने हैद्राबाद संघाला 6 विकेट्सनी मात देत गुणतालिकेतील चौथं स्थान कायम ठेवलं. शुभमन गिलच्या (Shubman Gill) दमदार अर्धशतकाच्या जोरावर केकेआरने विजय मिळवला. तर त्याला नितीश राणाच्या (Nitish Rana) महत्त्वपूर्ण 25 धावांचीही सोबत मिळाली. पण याच राणाने एका रांगड्या शॉटने थेट सीमारेषेवरील कॅमेराच फोडला.
केकेआरचा संघ 116 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. त्यावेळी 18 व्या शतकात हैद्राबादचा गोलंदाज जेसन होल्डर याने चौथा चेंडू टाकला असता फलंदाज नितीश राणाने चौकार खेचला. यावेळी चेंडू रोखण्यासाठी हैद्राबादचा राशिद पळाला पण त्याला त्यात यश आलं नाही. चेंडू सीमारेषेपार गेला, पण नेमका तिथे असलेल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर जाऊन आदळला. त्यामुळे कॅमेऱ्याची लेन्सच फुटली. विशेष म्हणजे चेंडू कॅमेऱ्याकडे येत असताना आणि लेन्सवर आदळताच लेन्स फुटल्याचा VIDEO ही स्पष्टपणे दिसतो आहे.
Nitish Rana breaks Camera lens?#KKRvSRH #IPL2021 #NitishRana pic.twitter.com/7ItIPsK6rb
— Subuhi S (@sportsgeek090) October 3, 2021
दरम्यान ओवरच्या चौथ्या चेंडूवर नितीश राणाने चौकार लगावला. पण लगेचच पुढच्याच चेंडूवर जेसनच्याच हाती तो बादही झाला. यष्टीरक्षक साहाने त्याचा झेल घेतला. पण राणाने गिलला साथ देत 33 चेंडूत महत्त्वापूर्ण 25 रन केले. ज्यानंतर अखेर कार्तिकने सामना फिनीश करत संघाला 6 विकेट्सनी विजय मिळवून दिला.
आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकत हैद्राबाद संघाने प्रथम फलंदाजी निवडली. पण हैद्राबादसाठी हा निर्णय़ चूकीचा ठरला. संघातील एकाही फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. ज्यामुळे संघ केवळ 115 धावाच करु शकला. संपूर्ण संघात सर्वाधिक धावा विल्यमसन (26), गार्ग (21) आणि अब्दुल समाद (25) यांनी केल्या. याखेरीज इतरांना 10 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. केकेआरकडून वरुण चक्रवर्ती, टीम साऊदी, शिवम मावी यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शाकिब अल हसनने 1 विकेट घेतली.
दरम्यान केकेआरचा संघ 116 धावांचे सोपं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात आला. यावेळी केकेआरची फलंदाजीही तशी ढासळली पण केकेआरकडून सलामीवीर शुभमनने दमदार अर्धशतक (57) ठोकत एकहाती डाव सांभाळला. त्याच्या सोबत राणाने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेर कार्तिकने 18 महत्त्वपूर्ण धावा करत सामना केकेआऱला 6 विकेट्नसनी जिंकवून दिला.
हे ही वाचा
IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट
IPL 2021 : विराटसेना विजयी, पंजाबवर 6 धावांनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवली एन्ट्री
(In SRH vs KKR match Nitish Ranas Shot smashes camera at the boundary See video)