मुंबई: टी20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) भारतीय संघाचं (Indian Cricket Team) आव्हान संपुष्टात आलं आहे. सेमीफायनलच्या फेरीत भारत पोहचू शकलेला नाही. त्यामुळे सध्या भारतीय क्रिकेटप्रेमी निराश आहेत. पण दुसरीकडे देशांतर्गत सुरु असलेल सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत (SMAT 2021) दररोज उत्कृष्ट सामने पार पडत आहेत. मग एकीकडे आयपीएल गाजवणारा ऋतुराज गायकवाड प्रत्येक सामन्यात तुफान खेळी करत असताना आता आज (8 नोव्हेंबर) झालेल्या मुंबई विरुद्ध छत्तीसगड सामन्यातही एक तुफान खेळी दिसून आली. ही खेळी छत्तीसगडच्या खेळाडूने खेळली आहे. विशेष म्हणजे या सामनयात टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू असलेला मुंबईचा (Mumbai Cricket Team) संघ अवघ्या 1 रनने हारला आहे.
यावेळी मुंबईच्या खेळाडूंवर छत्तीसगडचा एक खेळाडू भारी पडला आहे. आतापर्यंत मुंबई संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली 4 पैकी 2 सामने गमावले आहेत. छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा संघ 20 ओव्बरमध्ये 158 धावांच लक्ष्य गाठू न शकल्याने पराभूत झाला आहे. छत्तीसगडच्या संघाने उत्तम गोलंदाजी केलीच. पण फलंदाजीवेळी त्यांचा 29 वर्षीय खेळाडू शशांक सिंगने धमाकेदार फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई केली.
प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगडच्या संघाने 50 धावांवर 3 विकेट गमावले होते. तेव्हाच अखिल हेरवाड़करने शशांक सिंगसोबत 80 धावांची भागिदारी केली. यावेळी शशांकने तुफानी फलंदाजी करत 28 चेंडूत 203 च्या स्ट्राइक रेटने 57 धावा ठोकल्या. यातील 40 रन त्याने 8 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकार ठोकत केले आहेत. याच्या जोरावरच छत्तीसगडने 20 ओव्हरमध्ये 157 धावा केल्या. ज्यानंतर मुंबईची सुरुवात खराब झाली. पृथ्वी शॉ शून्यालवर तर यशस्वी जैस्वाल 3 धावा करु बाद झाला. त्यानंतर कर्णधार रहाणे आणि सिद्धेश लाडने 75 धावांची भागिदारी केली. लाड 46 धावा करु बाद झाला. रहाणेने 69 धावा करुन बाद झाला. अखेरच्या षटकात मुंबईला 7 धावांची गरज असताना सौरभ मजूमदारने केवळ 6 धावा देत 1 रनने संघाला विजय मिळवून दिला.
इतर बातम्या
मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा
(In Syed mushtaq ali trophy chhattisgarh beat mumbai by 1 run shashank singhs 57 runs made big diffrence)