मुंबई: सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत (SMAT 2021) मुंबई संघाने वडोदरा संघावर अप्रतिम विजय मिळवला आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला आहे बर्थडे बॉय पृथ्वी शॉ (Prithvi Shaw). पृथ्वी याचा आज (9 नोव्हेंबर) वाढदिवस असून त्याने 83 धावांची अप्रतिम खेळी केली आहे. विशेष म्हणजे पृथ्वीला त्याच्या वाढदिवसादिवशी बर्थ-डे गिफ्टही मिळू शकतं. लवकरच न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची निवड होणार असून यावेळी T20 मालिकेसाठी पृथ्वीला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे बीसीसीआय पृथ्वीला बर्थडे गिफ्ट देणार का? हीच चर्चा आहे.
मुंबईने वडोदरा संघाविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. गुवाहाटीच्या मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेने मुंबईकडून सुरुवात केली. दोघांनी अप्रतिम अशी 151 धावांची मोठी भागिदारी रचली. अजिंक्य रहाणेने 45 चेंडूत 71 धावा करुन बाद झाला. ज्यानंतरही पृथ्वीने पुढे किल्ला लढवला. त्याने 63 चेंडूत 83 धावा ठोकल्या. यावेळी त्याने 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले. ज्यानंतर शिवम दुबेने नाबाद 23 धावा करत मुंबईच्या स्कोरबोर्डवर 193 धावा लगावल्या.
मुंबईने ठेवलेल्या 194 धावांचा सामना करण्यासाठी आलेल्या वडोदरा संघाचा डाव 111 धावांवरच संपला. ते 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्सच्या बदल्यात 111 धावाच करु शकल्याने मुंबईचा संघ 82 धावांनी विजयी झाला. मुंबईत्या तनुस कोट्यानने 4 ओव्हरमध्ये 16 धावा देत 4 विकेट्स टिपल्या.
इतर बातम्या
India vs Namibia T20 world cup Result: स्पर्धेचा शेवट गोड, भारताचा नामिबीयावर 9 गडी राखून विजय
विराटने इशाऱ्यांमध्ये सांगितलं भावी कर्णधाराचं नाव, विश्वचषकातील अखेरच्या सामन्यात कोहली भावूक
(In syyed mushtaq ali trophy 2021 birthday boy prithvi shaw played 83 runs inning and mumbai won the match)