T20 World Cup 2021, Points Table: डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म परतला, श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय

| Updated on: Oct 28, 2021 | 11:24 PM

ऑस्ट्रेलियाचा धाकड सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म परतला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक लगावत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला आहे.

T20 World Cup 2021, Points Table: डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म परतला, श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय
डेव्हिड वॉर्नर
Follow us on

T20 Cricket World Cup 2021: यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2021) 22 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेला 7 विकेट्सनी मात देत विजय मिळवला आहे. या विजयासह आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे संघाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याचाही फॉर्म परतला आहे. सामन्यात त्याने अप्रतिम अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघाने सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पाने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 ऑव्हरमध्ये केवळ 12 धावा देत 2 विकेट्सही पटकावल्या. त्याच्याशिवाय पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्च यांनीही प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तर श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि असलंका यांनी प्रत्येकी 35 तर भानुका राजपक्ष याने 33 धावा केल्या. ज्याच्या जोरावर श्रीलंका संघ 154 धावसंख्या करु शकला.

वॉर्नरची बॅट तळपली

155 धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने उत्तम खेळी करत तब्बल 10 चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. तर कर्णधार फिंचने 37 आणि स्मिथने नाबाद 28 धावा करत संघाचा विजय पक्का केला. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने 2 आणि कर्णधार शनाकाने 1 विकेट घेतला. पण अखेर 7 गडी राखून ऑस्ट्रेलियाचाच विजय झाला.

ग्रुप 1 ची स्थिती काय?

सुपर 12 चे दोन ग्रुप असून ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, बांग्लादेश, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. यामध्ये इंग्लंडने वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला नमवत दोन विजय नावे करत दुसरं स्थान गाठलं आहे. इंग्लंडपेक्षा त्यांचा नेटरनरेट कमी असल्यामुळे ते मागे आहेत. तर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघाने प्रत्येकी 1-1 सामना जिंकत अनुक्रमे तिसरं आणि चौथं स्थान मिळवलं आहे. दोन्ही सामने पराभूत होत बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

सविस्तर गुणतालिका पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

इतर बातम्या

T20 World Cup 2021 च्या सामन्यांत अवघ्या 5 सेंकदातच कळतं कोण जिंकणार?, भारतीय संघाच न्यूझीलंड विरुद्ध काय होणार?

T20 World Cup 2021 मध्ये ‘या’ गोलंदाजांचा जलवा, भारताचे शेजारी करत आहेत धमाल!

India vs pakistan: ‘सामन्यानंतर विराटने पाकिस्तानच्या खेळाडूंना मिठी मारली, म्हणून त्यालाही अटक करणार का?,’ ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा सवाल

(In T20 World Cup 2021 Australia beat Sri Lanka with 7 wickets in hand david warner played important role)