T20 World Cup 2021 : यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) सर्वात बहुप्रतिक्षित सामना असणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला आहे. भारताचा दारुण पराभव झाल्यामुळे बऱ्याच काळानंतर विश्वचषकात भारताला पाककडून पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे 2007 पासून टी20 विश्वचषकात प्रथमच भारतीय संघ पाककडून पराभतू झाला आहे. याआधी 5 वेळा भारत जिंकला असून पहिल्यांदा पाकिस्तान विजयी झाला आहे. पण आता सर्वांना प्रश्न पडला आहे यानंतर भारत आणि पाकिस्तान आमने सामने कधी येणार.
मागील बरीच वर्ष भारत आणि पाकिस्तान या देशांतील तणावामुळे दोन्ही देश एकमेकांचे दौरे करत नाहीत. त्यामुळे केवळ आयसीसी ट्रॉफीच्या स्पर्धेतच दोन्ही संघ आमने-सामने येतात. यंदाच्या विश्वचषकातही तब्बल दोन वर्षानंतर भारत पाकिस्तान आमने सामने आले होते. 2019 च्या विश्वचषकानंतर दोन्ही संघ पहिल्यांदाचा खेळले होते. दरम्यान आता यानंतर दोन्ही संघ या विश्वचषकात पुन्हा आमने-सामने येऊ शकतात. ते म्हणजे दोघेही एकाच गटात असून इतर सामन्यात चांगली कामगिरी करुन दोन्ही संघ सेमी फायनलमध्ये गेल्यास त्यातही जिंकून जर फायनलमध्ये आले तर आमने-सामने भिडू शकतात. पण तत्पूर्वी भारताला उर्वरीत सामन्यात चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे.
सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.
152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.
हे ही वाचा :
(In T20 world cup 2021 India vs Pakistan may Face eachother again Know how)