मुंबई: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने (Brett Lee) आगामी टी20 विश्वचषकात (T20 Wolrd Cup) कोणता भारतीय फलंदाज कमाल करणार? याची भविष्यवाणी केली आहे. लीच्या मते सध्या खेळाडूंचा फॉर्म पाहता युवा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) टी20 विश्व चषकात (T20 World Cup 2021) कमाल करु शकतो. त्यामुळे त्याला योग्य स्थानी फलंदाजीला पाठवून विराट-रोहितवरील भार कमी करुन संघाने फायदा करु घेतला पाहिजे.
ली याला यंदा भारतीय संघ हा विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असेल असं वाटत आहे. भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी सामन्यांना सुरुवात करणार असून पहिलाच सामना पाकिस्तान संघाशी खेळणार आहे. दरम्यान ली ‘फॉक्स स्पोटर्स’ शी बोलताना म्हणाला, ‘इंग्लंडचा संघ हा अनुभवाच्या दृष्टीने एक ताकदवर संघ असला तरी माझ्यामते भारत हा स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे. इंडियन प्रीमियर लीगमुळे भारताला अनेक युवा खेळाडू मिळाले आहेत. यामध्ये काही वेगवानल गोलंदाज आहेतच. पण भारताची सलामी फलंदाजीही ताकदवर झाली आहे. ज्यामुळे भारत वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार आहे.’
ली केएल राहुल बद्दल बोलताना म्हणाला, ‘राहुल टी20 क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. त्याने आयपीएल 2021 मध्येही सर्वाधिक धावा केल्या आहेत.त्यात यूएईत त्याने 6सामन्यात 295 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताने विश्वचषकात राहुलला महत्त्वाचा फलंदाज म्हणून खेळवलं पाहिजे. ज्यामुळे त्याचं प्रदर्शन अजून सुधारेल आणि संघाला फायदा होईल.’
लीने सूर्यकुमार यादवचंही कौतुक केलं. तो म्हणाला, ‘मला वाटतं सूर्या हा भारतीय क्रिकेटमध्ये भविष्यातील सुपरस्टार आहे. तसचं पुढे बोलताना तो म्हणाला, ‘मला भारतीय संघ ताकदवर वाटत असला तरी मी देशभक्त असल्याने ऑस्ट्रेलियाचा संघच जिंकावा असं मला वाटतं. पण भारत नक्कीच फायनलपर्यंत बाजी मारेल.”
इतर बातम्या
KKR फायनलमध्ये पण दिनेश कार्तिकला शिक्षा, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी, IPL ने फटकारले
1 झेल 3 खेळाडू तरीही अपयश, LIVE सामन्यातील हा VIDEO पाहाच!
(In T20 world cup 2021 kl rahul will play special role says brett lee)