T20 World Cup 2021: यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) सुरुवातीपासूनच सामने अतिशय चुरशीचे होत असल्याचं दिसून येत आहे. अगदी ग्रुप स्टेजच्या सामन्यांपासून सामने रंगतदार होत आहेत. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने समोर येत आहे. कोणत्याही सामन्यात विजय आणि पराजयाचा निर्णय अवघ्या 5 सेकंदात होत आहे. 5 सेकंद म्हणजे सामन्यापूर्वी होणाऱ्या नाणेफेकीची 5 सेकंद. सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ मैदानाती स्थिती आणि वातावरण पाहून निर्णय घेत आहे आणि त्याप्रमाणेत अंतिम निर्णय़ समोर येत आहे.
आतापर्यंत सुपर 12 च्या 9 पैकी 8 सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ सामना जिंकला असून केवळ बांग्लादेश एक सामना नाणेफेक जिंकूनही पराभूत झाली आहे. त्यामुळे यंदाच्या टी20 वर्ल्ड कप 2021 च्या सुपर-12 फेरीमध्ये आतापर्यंत एकूण 9 सामन्यांपैकी 8 सामन्यात कर्णधाराने नाणेफेक जिंकत सामनाही जिंकला आहे. या सर्व सामन्यात कर्णधाराने प्रथम गोलंदाजी घेतल्याने विजय मिळवण्यात संघाला यश आलं आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली- 5 विकेट्सनी विजय
इंग्लंडने नाणेफेक जिंकली- 6 विकेट्सनी विजय.
श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकली- 5 विकेट्सनी विजय
पाकिस्तानने नाणेफेक जिंकली- 10 विकेट्सनी विजय
अफगानिस्तानने नाणेफेक जिंकली- 130 धावांनी विजय
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली- 8 विकेट्सनी विजय
पाकिस्तानने नाणेफेक जिंकली- 5 विकेट्सनी विजय
नामीबियाने नाणेफेक जिंकली- 4 विकेट्सनी विजय
बांग्लादेशने नाणेफेक जिंकली-8 विकेट्सनी पराभव
भारत आणि न्यूझीलंड हा सामना रविवारी अर्थात 31 ऑक्टोबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता नाणेफेक होणार आहे.
ग्रुप 2 मध्ये असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना पाकिस्तानने पहिल्या सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ जीवाचं रान कऱणार हे नक्की. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा विजय दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या पाकिस्तान पहिल्या स्थानी तर अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानी असून भारत आणि न्यूझीलंड हे संघ विजयी आणि चांगल्या रनरेटने गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
सुपर 12 चे दोन ग्रुप असून ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबीया हे संघ आहेत. यामध्ये पाकने भारत आणि न्यूझीलंड या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. तर अफगाणिस्तानने स्कॉटलंडला मात दिल्यामुळे ते 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. नामिबीया संघाने स्कॉटलंडला मात देत तिसरं स्थान गाठलं आहे. तर न्यूझीलंड, भारत हे संघ एक-एक पराभव स्वीकारुन चौथ्या, पाचव्या स्थानावर आहेत. तर स्कॉटलंडचा संघ दोन पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे.
इतर बातम्या
पाकिस्तानच्या क्रिकेट संघात 3 खेळाडू कोरोनाबाधित, क्रिकेट बोर्डाने दिली माहिती
T20 World Cup 2021 मध्ये ‘या’ गोलंदाजांचा जलवा, भारताचे शेजारी करत आहेत धमाल!
(In T20 world cup 2021 Most matches Toss winners winning match what will happen in india vs new zealand)