T20 World Cup 2021 मध्ये ‘या’ गोलंदाजांचा जलवा, भारताचे शेजारी करत आहेत धमाल!
टी20 विश्वचषकाच्या सुरुवातीपासून अगदी ग्रुप स्टेजेसच्या सामन्यांपासून अत्यंत चुरशीचे सामने होत आहेत. पण या सामन्यात काही गोलंदाजांनी खास कामगिरी करत सर्वाधिक विकेट्स मिळवल्या आहेत.
1 / 6
T20 world Cup 2021 सुरू होण्यापूर्वीपासून युएईतील मैदानांमध्ये फिरकीपटूंचा दबदबा राहिल्याचे दिसून आले आहे. आता स्पर्धा सुरु झाल्यानंतर फिरकीपटूंसह काही वेगवान गोलंदाजही चांगली कामगिरी करताना दिसून येत आहेत. तर सध्याच्या घडीला कोणी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत, यावर एक नजर मारुया...
2 / 6
यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्या नावावर आहेत. त्याने आतापर्यंत 5 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने केवळ 95 धावा दिल्या आहेत.
3 / 6
शाकिबनंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये स्कॉटलंडच्या जोश डेवीचा नंबर लागतो. त्याने 5 सामन्यांत 123 धावा देत 9 विकेट्स घेतल्या आहेत.
4 / 6
तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरु कुमारा आहे. त्याने 4 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याने 67 धावा दिल्या आहेत.
5 / 6
चौथ्या क्रमांकावरही श्रीलंकेचाच खेळाडू आहे. महेश तीक्षणा याने 3 सामन्यात 45 धावांच्या बदल्यात 8 फलंदाजाना तंबूत धाडलं आहे.
6 / 6
सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 गोलंदाजात पाचव्या स्थानी नामीबियाचा जेन फ्राईलिंक याचा नंबर लागतो. त्याने 4 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत.