T20 Cricket World Cup 2021: सर्वाधिक टी 20 विश्वचषक (T20 World Cup) मिळवलेल्या वेस्ट इंडिज संघाचा यंदाच्या विश्वचषकातील प्रवास खडतर सुरु आहे. सुपर 12 फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली असून सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात वेस्ट इंडिज संघाला पराभवाची चव चाखायला लागली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडेने 6 विकेट्सने मात दिल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa vs West Indies) वेस्ट इंडिज संघाला 8 विकेट्सने पराभूत केलं आहे.
मंगळवारी (26 ऑक्टोबर) दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रीका सामन्यात प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडीजने 20 ओव्हरमध्ये केवळ 143 धावाच केल्या. सलामीवीर एविन लुईसने 35 चेंडूत 56 धावा करत चांगली सुरुवात केली खरी पण नंतर लेंडल सिमन्सच्या धिम्या खेळीमुळे संघ मोठी धावसंख्या करु शकला नाही. त्यांनी तब्बल 56 डॉट चेंडू खेळले.
त्यानंतर 144 धावांचं आव्हान पार करताना दक्षिण आफ्रिका संघाने अगदी विश्वासार्ह फलंदाजी केली. त्यांचा टेम्बा 2 धावांवर बाद झाला पण दुसरा सलामीवीर रीजा हेंड्रिक्सने 39 धावांची उत्तम खेळी खेळली. त्याला डस्सेनने 43 धावांची साथ दिली. पण महत्त्वाची खेळी संघाचा विश्वासून फलंदाज मार्करमने खेळली. त्याने 26 चेंडूत नाबाद 51 धावा करत संघचा विजय पक्का केला.
South Africa are off the mark ?#T20WorldCup | #SAvWI | https://t.co/sEkHu1dNen pic.twitter.com/bvsIODsteV
— ICC (@ICC) October 26, 2021
यावेळी दक्षिण आफ्रिका संघाने टी20 साऱख्या प्रकारात समोरच्या संघाला 56 डॉट चेंडू खेळवले. यावरुन त्यांनी आज उत्तम गोलंदाजी केल्याचा प्रत्यय येतो. यावेळी सर्वोचत्कृष्ट गोलंदाजी एनरिक नॉर्खिया याने केली. त्याने 4 ओव्हरमध्ये केवळ 14 धावांच्या बदल्यात 1 विकेटही गेतला. त्याने तब्बल 24 पैकी 14 चेंडू निर्धाव टाकले. ज्यामुळेच त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
इतर बातम्या
T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!
मोठी बातमी: टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज, टी20 वर्ल्डकपनंतर सांभाळणार जबाबदारी
‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग
(In T20 World Cup 2021 South Africa beat West indies with 8 wickets in hand)