T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?
आधी पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्याने भारताची विश्वचषकातील अवस्था बिकट झाली आहे. सेमीफायनलमध्ये भारताचं पोहचणं अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नाही.
1 / 5
T20 World Cup 2021 मध्ये भारताचं खराब प्रदर्शन पाहून सर्वचजण हैराण आहेत. आधी पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडकडून मात मिळाल्यामुळे भारताचं पुढील फेरीत पोहचणं जवळपास अशक्य झालं आहे.
2 / 5
भारताने सलग दोन मॅच गमावल्यामुळे गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर गेला आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताचं पोहोचणं अवघड झालं असलं तरी क्रिकेट हा एक खेळ असल्याने यामध्ये काहीही होऊ शकतं.
3 / 5
भारताचे पुढील सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबिया या संघाविरुद्ध आहेत. या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट-रनरेट खूप वाढवावा लागेल. किमान 100 धावांच्या फरकाने सामने जिंकणे भारताला गरजेचे आहे.
4 / 5
दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ स्कॉटलंड आणि नामीबिया संघाविरुद्ध अगदी छोट्या फरकाने पराभूत होणं गरजेचं आहे.
5 / 5
तसचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडला अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागणं गरजेचं आहे. हे सार फार अवघड असलं तरी हा खेळ असल्याने काहीही होऊ शकतं हे नक्की.