मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) जागतिक क्रिकेटला एकापेक्षा एक धुरंदर क्रिकेटपटू दिले. जगातील सर्वोत्कृष्ठ फलंदाज म्हणून नावाजल्या जाणारा ज्याला अगदी क्रिकेटचा देव म्हटलं जात तो सचिन तेंडुलकरही (Sachin Tendulkar) भारताताच. सर्व प्रकारच्या फॉर्मेटमध्ये तगडी टीम असणाऱ्या भारतीय संघात आज एकदिवसीय टीममध्ये 5 नव्या चेहऱ्यांनी पदार्पण केलं आहे. यातील तिघांनी तर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आहे. विशेष म्हणजे 40 वर्षानंतर असे काही भारतीय क्रिकेटमध्ये घडले आहे. यापूर्वी डिसेंबर, 1980 मध्ये अशाचप्रकारे 5 नवोदीतांनी भारतीय संघात एकाचवेळी पदार्पण केलं होतं.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात (India vs Sri lanka ODI) नाणेफेक होण्यापूर्वीच भारतीय संघाने हे बदल केले होते. याचे कारण तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकल्याने मालिका भारताने जिंकली आहे. त्यामुळे नवे प्रयोग करण्यासाठी भारताने या 5 नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये संजू सॅमसन आणि राहुल चहर या टी-20 मध्ये भारतीय संघातून खेळलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. तर कृष्णप्पा गौथम, नितेश राणा आणि चेतन सकारिया या पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूंचाही समावेश आहे.
? ?: That moment when the 5⃣ ODI debutants received their #TeamIndia cap!? ? #SLvIND@IamSanjuSamson | @NitishRana_27 | @rdchahar1 | @Sakariya55 | @gowthamyadav88 pic.twitter.com/1GXkO13x5N
— BCCI (@BCCI) July 23, 2021
भारती क्रिकेट संघात आज (23 जुलै) ज्याप्रमाणे 5 खेळाडूंनी डेब्यू केला. त्याच प्रमाणे याआधी 40 वर्षांपूर्वी भारतीय संघाच्या 1980-81 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच खेळाडूंनी संघात पदार्पण केलं होतं. यावेळी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात मेलबर्नच्या मैदानात किर्ती आझाद, दिलीप जोशी, रॉजर बिनी, संदीप पाटील आणि तिरुमलाई श्रीनिवासन यांना संघात संधी देण्यात आली होती.
हे ही वाचा :
IND vs SL : ‘या’ कारणामुळे राहुल द्रविडने दीपकला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं, भुवनेश्वरने केला खुलासा
IND vs ENG : भारताचा नवखा गोलंदाज, 74 धावा देत 7 विकेट, 24 वर्षांनंतर लॉर्ड्सवर विजय
(In team India 5 players debuted against sri lanka in third odi history repeated after 40 years)