चेन्नई : तामिळनाडू प्रीमियर लीग TNPL 2023 मध्ये 18 जूनला हैराण करुन सोडणारं दुश्य पाहायला मिळालं. अश्विनने नुसती कॅच पकडली नाही, तर त्याने सर्वांना थक्क करुन सोडलं. अश्विनने ती कॅच बनवली. हा झेल पाहून अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. अनेकजण फक्त पाहत बसले. TNPL च्या कॉमेंटेटर्सनी असं रिएक्ट केलं की, त्यांना विश्वासच बसला नाही.
स्टोरीमध्ये थोडं ट्विस्ट आहे. ही कॅच पकडणाऱ्याच नाव अश्विन आहे. तो रविचंद्रन अश्विन नाहीय, तर मुरुगन अश्विन आहे. महत्वाच म्हणजे या सामन्यात दोन्ही अश्विन खेळत होते.
या सामन्यात अश्विन-अश्विन आमने-सामने
मुदरै पँथर्स आणि डिंडीगुल ड्रॅगन्समध्ये हा सामना सुरु होता. हा सामना रविचंद्रन अश्विन नेतृत्व करणाऱ्या डिंडीगुल ड्रॅगन्सने जिंकला. पण मुदरै पँथर्सच्या मुरुगन अश्विनने ही कॅच पकडून सर्वांच मन जिंकलं. डिंडीगुल ड्रॅगन्सच्या इनिंगमध्ये पावरप्ले सुरु होता. गुरजपनीत सिंह चौथी ओव्हर टाकत होता. त्याने आधीच दोन विकेट काढले होते.
फटका खेळताना मिसटाइम
या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर डींडीगुलचा फलंदाज एस. अरुणने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका खेळताना मिसटाइम झालं. चेंडू हवेत उडाला. चेंड नो मॅन्स लँडच्या भागात पडेल असं वाटलं. कॅच पकडण्यासाठी अनेक फिल्डर्स धावले. कॅचची शक्यता फार कमी होती.
असंभव ते संभव
त्यावेळी चित्त्याच्या चपळाईने मुरुगन अश्विन चेंडूच्या दिशेने झेपावला. एक असंभव कॅच त्याने शक्य केली. सोशल मीडियावर आता या कॅचची चर्चा सुरु आहे.
WHAT. A. CATCH. MURUGAN. ASHWIN. ??? #TNPL2023 pic.twitter.com/bzmdZJGFYT
— Farid Khan (@_FaridKhan) June 19, 2023
कोणी जिंकला सामना?
ही लो स्कोरिंग मॅच होती. मदुरै पँथर्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 123 धावा केल्या. रविचंद्रन अश्विनच्या डिंडीगुल ड्रॅगन्सने 35 चेंडू आणि 7 विकेट राखून विजय आरामात विजय मिळवला. 124 धावांच टार्गेट त्यांनी गाठलं.