मुंबई : सध्या सुरु असलेली आयपीएल (IPL 2021) संपताच टी-20 विश्वचषकाला(ICC T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचे केवळ 2 सामने शिल्लक आहेत. चेन्नई सुपरकिंग्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला असून दिल्ली आणि केकेआर यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे. पण या आतापर्यंतच्या सामन्यानंतर आता आगामी विश्वचषकात भारतीय संघातील 15 पैकी केवळ 5 खेळाडूच आयपीएलमध्ये आहेत. इतर 10 जणांचे संघ स्पर्धेच्या बाहेर गेले आहेत. त्यात यंदा 6 खेळाडूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती, तर 4 जणांची काहीशी दिलासादायक होती.
आगामी विश्वचषकासाठी बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीम इंडियामध्ये (Team India) 15 सदस्यांचा समावेश आहे. पण यातीलच काही सदस्यांनी आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी केल्याने बीसीसीआयच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे संघ बदल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान भारत हा थेट सुपर-12 मध्ये उतरणाऱ्या संघामधील एक असल्याने 15 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करु शकतो.
आयपीएल भारतीय कर्णधार विराटची कामगिरी ही सुमार राहिली. नुकताच प्लेऑफमध्ये केकेआरकडून पराभूत होऊन विराटचा आरसीबी संघ स्पर्धेबाहेर गेला. दरम्यान कोहलीने यंदाच्या पर्वात 15 सामन्यात 29 च्या सरासरीने 405 धावा केल्या. 3 अर्धशतकंही त्याने लगावली. मागील वर्षी मात्र त्याने 15 सामन्यातच 466 धावा केल्या होत्या. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा त्याची कामगिरी घसरलेली दिसून आली.
पंजाब किंग्स चा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) मात्र त्याची उत्तम कामगिरी यंदाही कायम ठेवली. त्याने केवळ 13 सामन्यात 63 च्या सरासराने 626 धावा केल्या. 6 अर्धशतकही त्याने लगावली. सध्या तो ऑरेंज कॅपच्या यादीतही एक नंबरला आहे.
भारतीय संघाचा स्टार अष्टैपूल खेळाडू हार्दिक पंड्याही यंगा खास कामगिरी करु शकला नाही. त्याने गोलंदाजीतर केलीच नाही आणि फलंदाजीतही 12 सामन्यातं 14 च्या सरासरीने 127 धावाचं करु शकला. मागील वर्षीही त्याने 14 सामन्यात केवळ 281 धावाचं केल्या होत्या. दुसरीकडे इशान किशने 10 सामन्यात 27 च्या सरासरीने 241 धावाचं केल्या.
विश्वचषकात निवडलेल्या गोलंदाजांचा विचार करता. राहुल चाहर आणि भुवनेश्वर यांची कामगिरी चिंताजनक असली तरी बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी मात्र त्यांची लय कायम ठेवली आहे. राहुल चाहरने 11 सामन्यात केवळ 13 विकेट्स घेतले. तर भुवनेश्वर कुमारने 11 सामन्यात केवळ 6 विकेट्स घेतले. या दोघांनी कामगिरी चिंताजनक आहे. मात्र दुसरीकडे बुमराहने 14 सामन्यांत 21 विकेट्स घेतले असून वरुणने 15 सामन्यात केवळ 16 विकेट्स घेतल्या.
इतर बातम्या
The King is Back! जगातला बेस्ट फिनिशर परतला, धोनीची मॅचविनिंग खेळी पाहून विराट कोहली खूश
DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!
(In Upcoming T20 Worldcups 10 players of team india from 15 Players are out of IPL 2021)