T20 World Cup 2021: आंद्रे रस्सेल (Andre Russell) कायम आपल्या धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. पण यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) त्याला हवी तशी काय किमान सुमारही कामगिरी करता येत नाहीये. कायम चौकार-षटकारांची बरसात करणारा रस्सेल यंदा दुहेरी संख्याही गाठण्यात अपयशी ठरत आहे. स्पर्धेत तो 3 सामन्यात मिळून 5 धावाही करु शकलेला नाही. बांग्लादेशने तर त्याला स्ट्राईकवरही येऊ दिलेलं नाही.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश सामन्यातही 13 व्या षटकात पोलार्ड रिटायर्ड हर्ट झाला असताना रस्सेल फलंदाजीला आला. तो नॉन-स्ट्राइकर एंडवर असताना स्ट्राइकवर रोस्टन चेज होता. त्यावेळी बांग्लादेशच्या तस्कीन अहमदने चौथा चेंडू फेकला असताना चेजने शॉट खेळला आणि चेंडू तस्कीनच्या बुटांना लागून थेट नॉन-स्ट्राइकरच्या येथील स्टम्प्सना लागला. त्यावेळी रस्सेल धाव घेण्यासाठी थोडा पुढे आला असल्याने तो बाद घोषित करण्यात आला. त्यामुळे त्याला खातं खोलणं तर दूर स्ट्राईकवरही येता आलं नाही.
बांग्लादेशने सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. त्यानंतर बांग्लादेशच्या गोलंदाजानी चांगली कामगिरी करत वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला टिकू दिलं नाही. केवळ रोस्टन चेज (39) आणि निकोलस पूरन (40) यांनी टिकून फलंदाजी केल्यामुळे वेस्ट इंडिजने 142 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बांग्लादेश संघाची सुरुवात खास झाली नाही. पण लिटॉन दासने 44 धावांची आक्रमक खेळी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अखेरच्या षटकात महम्मदउल्लाने नाबाद 31 धावा करत विजय मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अगदी अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर बांग्लाेदेशला 3 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
इतर बातम्या
Photos | ‘लिटील मास्टर’च्या टेस्ट डेब्यूची हाफ सेंच्युरी; कसा होता सुनील गावस्करांचा झंझावात?
T20 World Cup 2021, Points Table: डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म परतला, श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय
दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत, अहमदाबाद किंवा लखनौच्या कर्णधार पदावर नजर
(In West indies vs bangladesh match Andre russel got Runout on non strikers end)