राजकोट: वर्ष बदललय. पण सूर्युकमार यादवचा फॉर्म, बॅटिंगची स्टाइल तीच आहे. टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादवचा 2022 चा फॉर्म कायम आहे. त्याने शनिवारी राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या T20 सामन्यात तुफानी शतक ठोकलं. सूर्याने फक्त 45 चेंडूत T20 करिअरमधील तिसरं शतक ठोकलं. 6 महिन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने ठोकलेलं हे तिसर शतक आहे. T20 मध्ये भारतासाठी तीन शतकं ठोकणारा सूर्यकुमार यादव दुसरा फलंदाज बनलाय. कालच्या सामन्यात सूर्याने काही लाजवाब फटके मारले. एका फटका खेळताना सूर्या जमिनीवर पडला पण त्याने सिक्स मारला.
तिसऱ्या सामन्यात फुल फॉर्ममध्ये
2022 च्या वर्षात T20 इंटरनॅशनलमध्ये सूर्यकुमार यादवने एकहजारपेक्षा जास्त धावा केल्या. 2023 ची सुरुवात सूर्यकुमार यादवसाठी चांगली झाली नव्हती. मुंबईत पहिल्या T20 सामन्यात तो स्वस्तात बाद झाला होता. पण सूर्याला पुनरागमन करायला फार वेळ लागला नाही. त्याने पुण्यात दुसऱ्या T20 सामन्यात वेगवान अर्धशतक झळकावलं. तिसऱ्या सामन्यात सूर्या फुल फॉर्ममध्ये आला होता. त्याने श्रीलंकेची चांगलीच धुलाई केली.
रोहितनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय
श्रीलंकेविरुद्धची सीरीज 1-1 अशी बरोबरीत होती. सीरीज जिंकण्यासाठी अखेरच्या टी 20 सामन्यात फलंदाजांकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती. सूर्याने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. राजकोटमध्ये डावाच्या सहाव्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्याने फार वेळ घेतला नाही. तिसरा चेंडू बाऊंड्री पार पोहोचवून आपला इरादा जाहीर केला. सूर्याने 26 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अखेरच्या 5 ओव्हर्समध्ये शतक झळकावलं.
सूर्याने फक्त 45 चेंडूत शतक ठोकलं. टी 20 इंटरनॅशनलमध्ये रोहित शर्मानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय आहे. रोहितने फक्त 35 चेंडूत शतक झळकावलं होतं. या फॉर्मेटमध्ये तीनपेक्षा जास्त सेंच्युरी मारणारा दुसरा भारतीय आहे.
6 महिन्याात दुसरं शतक
सूर्यकुमार यादव 45 वा T20 इंटरनॅशनल सामना खेळतोय. सूर्याच 6 महिन्यातील हे तिसरं टी 20 शतक आहे. 10 जुलै 2022 रोजी इंग्लंड विरुद्ध नॉटिंघममध्ये त्याने पहिलं टी 20 शतक झळकावलं होतं. सूर्याने या मॅचमध्ये 117 धावा फटकावल्या होत्या. 20 नोव्हेंबर 2022 रोजी माउंट माउनगानुई येथे न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 111 धावा फटकावून दुसरं शतक झळकावलं होतं.