IND vs AFG 2nd T20i Toss | टीम इंडियाने टॉस जिंकला, अफगाणिस्तान विरुद्ध विराटचं कमबॅक

| Updated on: Jan 14, 2024 | 6:53 PM

India vs Afghanistan 2nd T20I Toss | टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यातही टॉस जिंकला आहे. जाणून घ्या टीम इंडिया आणि अफगाणिस्तानच्या प्लेईंग ईलेव्हमध्ये कोण कोण आहेत?

IND vs AFG 2nd T20i Toss | टीम इंडियाने टॉस जिंकला, अफगाणिस्तान विरुद्ध विराटचं कमबॅक
Follow us on

इंदूर | टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील टी 20 मालिकेतील दुसऱ्या टी 20 सामन्याचं आयोजन इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेत अफगाणिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीममध्ये विराट कोहली याचं कमबॅक झालं आहे.

टीम इंडियात 2 बदल

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाने या दुसऱ्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हमध्ये 2 बदल करण्यात आले आहेत.  यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली या दोघांची प्लेईंग ईलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे.  यशस्वीला दुखापतीमुळे पहिल्या टी 20 सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यामुळे शुबमन गिल याला संधी देण्यात आली होती. मात्र आता यशस्वीच्या एन्ट्रीमुळे शुबमनला बाहेर बसावं लागलंय. तर विराट परतल्याने तिलक वर्मा याला बाहेर बसावं लागलं आहे. तर दूसऱ्या बाजूला अफगाणिस्ताने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल करण्यात आला आहे. नूर अहमद याची प्लेईंग ईलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे. तर रहमत शाह याला बाहेर ठेवण्यात आलं आहे.

अफगाणिस्तानसाठी करो या मरो

टीम इंडियाने या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने पहिला सामना हा 6 विकेट्सने जिंकला. त्यामुळे आता अफगाणिस्तानला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. तर टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्याचा निकाल कोणत्या टीमच्या बाजूने लागतो, हे पुढील काही तासात स्पष्ट होईल.

कॅप्टन रोहित शर्मा टॉसनंतर काय म्हणाला?

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कर्णधार), रहमानुउल्लाह गुरबाज(विकेटकीपर), अजमातुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, नूर अहमद, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.