इंदूर | टीम इंडियाने नववर्ष 2024 मधील पहिल्याच आणि टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा विजय मिळवला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेलं 159 धावांचं आव्हान हे शिवम दुबे याने केलेल्या नाबाद 60 रन्सच्या जोरावर टीम इंडियाने सहज पूर्ण केलं. त्यामुळे आता टीम इंडिया दुसऱ्या सामना जिंकून मालिका विजयाच्या हिशोबाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.
दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियात घातक बॅट्समनची एन्ट्री होणार आहे. हा दुसरा तिसरा कुणी नसून विराट कोहली आहे. विराट कोहली हा वैयक्तिक कारणामुळे पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र तो उर्वरित मालिकेत खेळणार असल्याचं टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड म्हणाले होते. त्यानुसार आता विराट टीम प्लेईंग ईलेव्हनमध्ये परतणार आहे. विराटने अखेरचा टी 20 सामना हा इंग्लंड विरुद्ध नोव्हेंबर 2022 साली खेळला होता.
आता विराटची टीममध्ये पुन्हा एन्ट्री होत असल्याने प्लेईंग ईलेव्हनमधून कुणाला बाहेरचा रस्ता दाखवायचा, असा मोठा प्रश्न हा कॅप्टन रोहित शर्मासमोर असणार आहे. दुसरा सामना हा 14 जानेवारी रोजी इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे. आता विराटसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण जागा करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीसाठी तिलक वर्मा याला बाहेर बसावं लागू शकतं.
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.