IND vs AUS 1st ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीजमध्ये टीम इंडियासाठी अपेक्षित सुरुवात झाली आहे. काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला वनडे सामना झाला. टीम इंडियाने ही मॅच आरामात जिंकली. केएल राहुलची झुंजार इनिंग आणि रवींद्र जाडेजाच्या ऑलराऊंडर प्रदर्शनाच्या बळावर टीम इंडियाने 5 विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयाची पायाभरणी आधीच झाली होती. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने 25 चेंडूत ऑस्ट्रेलियाला उद्धवस्त केलं होतं.
टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी स्वीकारली. टीम इंडियाने या मॅचमध्ये 4 पेस बॉलर खेळवले. भारतीय वेगवान बॉलर्सनी आपला जलवा दाखवला. ऑस्ट्रेलियाची इनिंग 188 धावांवर संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंड्या, शमी आणि सिराजने मिळून 10 पैकी 7 विकेट घेतले.
शमीने केली सुरुवात
ऑस्ट्रेलियाच्या डावात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत टीम इंडियाच्या वेगवान बॉलर्सची दहशत दिसून आली. खासकरुन शमी आणि सिराजने ऑस्ट्रेलियाची वाट लावली. मोहम्मद शमीने 28 वी ओव्हर टाकली. या ओव्हरमधील चौथा चेंडू निर्धाव होता. पाचव्या चेंडूवर विकेट मिळाला. सहावा चेंडू निर्धाव होता. त्यानंतर शमीने पुढच्या ओव्हरमध्ये कॅमरुन ग्रीनचा विकेट घेतला. एकही धाव दिली नाही. शमीने सलग 15 चेंडूवर एकही धाव न देता 3 विकेट घेतले. त्याच्या गोलंदाजीच पृथ्थकरण (3/17) असं होतं.
CASTLED!
What a delivery THAT from Mohammad Shami ??
He has scalped 3️⃣ wickets in no time!
Live – https://t.co/BAvv2E8cgJ #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/BymtCPAmXQ
— BCCI (@BCCI) March 17, 2023
सिराजच तुफान
त्यानंतर सिराजने (3/29) हे काम केलं. इनिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये सिराजने पहिली विकेट घेतली. त्यानंतर 34 व्या ओव्हरमध्ये त्याने जोरदार पुनरागमन केलं. 36 व्या ओव्हरचे पहिले तीन चेंडू निर्धाव होते.
चौथ्या चेंडूवर शेवटचा विकेट काढला. शमी आणि सिराजने सलग 25 चेंडूवर ऑस्ट्रेलियाला जखडून ठेवलं. या 25 चेंडूत एकही रन्स न देता 5 विकेट काढले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावात संपला.