IND vs AUS 1st T20 | वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये झालेल्या पराभवातून टीम इंडियाचे फॅन्स अजून सावरलेले नाहीत. हा पराभव कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली तसेच हेड कोच राहुल द्रविड यांच्या जिव्हारी लागला. कदाचितच ते यातून बाहेर पडले असतील. पण पुढे तर जावच लागेल. टीम इंडिया आपल्या पुढच्या प्रवासासाठी सज्ज आहे. योगायोगाने समोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन टीमच आव्हान आहे. त्यांनीच फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं होतं. गुरुवार 23 नोव्हेंबरपासून दोन्ही टीम्समध्ये T20 सीरीज सुरु होतेय. यावेळी नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या हाती आहे. नव्या रोलमध्ये यश मिळवून देण्यासाठी सूर्याने टीमला रोहित शर्माचाच मंत्र दिला आहे.
वर्ल्ड कप फायनलनंतर चार दिवसांच्या आत ही T20 सीरीज सुरु होत आहे. बहुतेक सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. पण सूर्यकुमार यादव त्यात नाहीय. तो T20 रँकिंगमधील नंबर 1 फलंदाज आहे. सूर्याकडे टीमच नेतृत्व सोपवण्यात आलय. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे सूर्यकुमार यादवला कॅप्टन बनवण्यात आलय. तो फक्त कॅप्टनच नाहीय. T20 सीरीजच्या स्क्वाडमधील तो सीनियर खेळाडू आहे. त्याच्यावर जास्त जबाबदारी असेल.
सूर्या काय म्हणाला?
सूर्यकुमार यादव कुठल्याही फॉर्मेटमध्ये पहिल्यांदा टीम इंडियाच नेतृत्व करतोय. तो आपल्या नेतृत्वाखाली टीमला कसं पुढे घेऊन जाणार?, टीमच्या युवा खेळाडूंना काय संदेश देणार? या बद्दल फॅन्सच्या मनात उत्सुक्ता आहे. विशाखापट्टनमध्ये पहिला T20 सामना होणार आहे. त्याआधी सूर्याला या बद्दल विचारण्यात आलं. पुढच्यावर्षी T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
रोहित शर्माची फिलॉसोफी स्पष्टपणे दिसून आली
त्यानंतर सूर्यकुमार यादवने जे सांगितलं, त्यातून कॅप्टन रोहित शर्माची फिलॉसोफी स्पष्टपणे दिसून आली. सूर्याने टीमच्या सर्व खेळाडूंना एवढच सांगितलय की, “बिनधास्त खेळा. टीमसाठी सेल्फलेस म्हणजे निस्वार्थी भावनेने खेळ दाखवा” जेणेकरुन टीमच्या विजयाला हातभार लागेल. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने याच अंदाजात फलंदाजी केली होती. सूर्याला युवा खेळाडूंना सुद्धा हीच शिकवण द्यायची आहे. मला स्वत:ला सुद्धा याच अंदाजात खेळायला आवडत, असं सूर्याने सांगितलं. टीम सर्वात आधी हेच त्याने प्रत्येकाला सांगितलय.