Ind vs Aus 1st Test : ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या कसोटी सामन्याची निराशाजनक सुरुवात झाली. अवघ्या 2 रन्समध्ये त्यांचे 2 विकेट गेले होते. त्यावेळी मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियन टीमला गरज असताना, त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी मिळून रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल आणि आर.अश्विन यांच्या फिरकी गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला. खरंतर ऑस्ट्रेलियाला सर्वात जास्त धोका भारताच्या स्पिन गोलंदाजांपासून आहे. तिघांनी मिळून 22 ओव्हर्स टाकल्या. पण त्यांना एकही विकेट मिळाली नाही. पहिल्या दिवशी लंचला ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 76/2 आहे.
अश्विनने टाकलेला एक चेंडू थोडा वर आला
पहिला कसोटी सामना सुरु होण्याआधी नागपूरच्या विकेटबद्दल बरीच चर्चा झाली. ही खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे, धोकादायक आहे, असं बरच बोललं गेलं. पण एखाद-दुसरा अपवाद वगळता अजून ही खेळपट्टी धोकादायक वाटलेली नाही. अश्विन 23 वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी अश्विनने टाकलेला एक चेंडू थोडा वर आला. लाबुशेनला तो व्यवस्थित खेळता आला नाही.
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) February 9, 2023
जिंकण्याचा आणखी त्वेष निर्माण होतो
अश्विनने लगेच आक्रमक होत लाबुशेनकडे पाहून इशारा केला. त्याला लाबुशेननेही लगेच प्रत्युत्तर दिलं. दोघांमधील हे द्वंद पाहण्यासारख होतं. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरीजमध्ये बऱ्याचदा खेळाडूंमध्ये मैदानावर असे प्रसंग घडतात. ज्यामुळे मैदानावरील वातावरण तापत. खेळाडूंमध्ये जिंकण्याचा आणखी त्वेष निर्माण होतो. आताही तसच घडलय. अश्विन आणि लाबुशेनमध्ये जे घडलं, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
लाबुशेनचा पहिल्या सत्रात दमदार खेळ
लाबुशेनचा हा भारतातील पहिला कसोटी सामना आहे. कसोटी क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज असलेला लाबुशेन भारत दौऱ्याची तयारी करत होता. आतापर्यंत लाबुशेनची बॅटिंग प्रभावी वाटलेली आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला, तेव्हा लाबुशेन 110 चेंडूत 47 धावांवर खेळत होता. स्मिथसोबत त्याने नाबाद 74 धावांची भागीदारी केली होती. लाबुशेनने त्याच्या खेळीत एकूण 8 चौकार मारले. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट घेण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.