Ind vs Aus 1st Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. पहिल्या कसोटीसाठी टॉस उडवण्यात आला. ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने टॉस जिंकला. ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरच्या खेळपट्टीवर चौथ्या डावात बॅटिंग करणं खूप कठीण असतं. या सीरीजमध्ये टीम इंडियाकडून दोन आणि ऑस्ट्रेलियाकडून एक खेळाडू डेब्यु करत आहे. क्रिकेटप्रेमींना भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजची मोठी उत्सुक्ता आहे. कारण याआधी दोन्ही देशांमधील टेस्ट सीरीज उत्कंठावर्धक झाल्या आहेत. अलीकडच्या काही वर्षात बॉर्डर-गावस्कर सीरीजवर टीम इंडियाने वर्चस्व गाजवलय.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन ही ट्रॉफी जिंकली. टेस्ट सीरीजमधील त्याच पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आली आहे.
भारताकडून कोणी डेब्यु केला?
भारताकडून आज सूर्यकुमार यादव आणि विकेटकीपर बॅट्समन केएस भरत यांनी डेब्यु केला. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फीने पदार्पण केलं. नागपूर कसोटीत दोन्ही बाजूकडून एकूण 3 खेळाडूंनी डेब्यु केला.
SKY makes his TEST DEBUT as he receives the Test cap from former Head Coach @RaviShastriOfc ? ?
Good luck @surya_14kumar ? ?#TeamIndia | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/JVRyK0Vh4u
— BCCI (@BCCI) February 9, 2023
दोघांपैकी अखेर एकाला संधी?
सूर्यकुमार यादव खेळणार असल्याने शुभमन गिलला बाहेर बसाव लागलं आहे. ऋषभ पंतच्या जागेवर या दोघांपैकी कोणाला संधी द्यायची? यावरुन कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्यामध्ये बराच खल झाला.
कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटीसाठी सूर्यकुमार यादवसाठी अनुकूल होता. सूर्यकुमार प्लेइंग 11 मध्ये खेळवावं, असं त्याचं मत होतं. त्याचवेळी हेड कोच राहुल द्रविड यांचा शुभमन गिलसाठी आग्रह आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत शुभमन गिलला संधी द्यावी, असं त्यांचं मत होतं. अखेर कॅप्टन रोहित शर्माच्या पसंतीने सूर्यकुमार यादवला संधी डेब्युची संधी मिळाली
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज,
ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11
पॅट कमिंस (कॅप्टन), डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.