Virat Kohli Bat Price : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा समावेश जगातील टॉप बॅट्समनमध्ये होतो. भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर दुसरं मोठ नाव असेल, तर ते विराट कोहली आहे. कारण सचिनच्या विक्रमांच्या जवळपास जाण्याची क्षमता सध्या फक्त विराटमध्ये आहे. फलंदाजीत विराटची अनेकदा सचिनशी तुलना होते. विराट आपल्या फलंदाजीच्या बळावर नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करतोय. जुने रेकॉर्ड मोडतोय. विराट ज्या बॅटने खेळतो, त्याची किंमत किती असेल? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? याच विराटच्या बॅटबद्दल आपण जाणून घेऊया.
बॅटवरच्या स्टिकरसाठी विराटला वर्षाला किती कोटी मिळतात?
विराट ज्या बॅटच्या बळावर सर्वोत्तम प्रदर्शन करुन इथवर पोहोचला, त्याची किंमत, वैशिष्ट्य तुम्हाला ठाऊक आहे का? या बॅटबद्दल आज आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत. टीम इंडियातील प्रत्येक बॅट्समन आपल्या बॅटवर कुठल्या ना कुठल्या कंपनीचा स्टिकर लावून खेळतो. यात एमआरएफ (MRF), सिएट (CEAT) आणि एसजी (SG) हे प्रसिद्ध ब्रांड आहेत. विराटच्या बॅटवर एमआरएफचा (MRF) स्टिकर आहे. त्यासाठी त्याने एमआरएफ टायर कंपनी बरोबर करार केला आहे. बॅटवर MRF चा स्टिकर लावून खेळण्यासाठी विराटला वर्षाला 10 कोटी रुपये मिळतात.
भारतात विराटच्या एका बॅटची किंमत किती?
विराट कोहली ज्या बॅटने खेळतो, ती ग्रेड-ए इंग्लिश विलो बॅट आहे. विराटकडे अशी एकच नाही, अनेक बॅट्स आहेत. विराटच्या एका बॅटच्या किंमतीबद्दल बोलायच झाल्यास, भारतात त्याच्या एका बॅटची किंमत 20,000 रुपयांच्या घरात आहे.
दुसरी कसोटी कधीपासून?
कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम दिल्लीमध्ये पोहोचली आहे. दोन्ही देशांमध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीज सुरु आहे. दिल्लीत उद्या म्हणजे 17 फेब्रुवारीपासून कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाकडे 1-0 अशी आघाडी आहे. नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना टीम इंडियाने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला.