IND vs AUS Test : KL Rahul चा फिल्डिंग करताना डोळा लागला? हा घ्या पुरावा, VIDEO

| Updated on: Feb 19, 2023 | 7:47 AM

IND vs AUS Test : दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुल लवकर बाद झाला. त्यामुळे एक्सपटर्स आणि चाहते त्याला टीममधून ड्रॉप करण्याची मागणी करतायत. फक्त बॅटनेच नाही, तर राहुलने फिल्डिंग करताना एक मोठी चूक केली.

IND vs AUS Test :  KL Rahul चा फिल्डिंग करताना डोळा लागला? हा घ्या पुरावा, VIDEO
KL Rahul
Image Credit source: twitter
Follow us on

IND vs AUS Test : ऑस्ट्रेलियासाठी डेविड वॉर्नर तर टीम इंडियासाठी केएल राहुल डोकेदुखी ठरतोय. सध्या केएल राहुल अत्यंत खराब फॉर्ममध्ये आहे. नवी दिल्लीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुल लवकर बाद झाला. त्यामुळे एक्सपटर्स आणि चाहते त्याला टीममधून ड्रॉप करण्याची मागणी करतायत. फक्त बॅटनेच नाही, तर राहुलने फिल्डिंग करताना एक मोठी चूक केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा ओपनर उस्मान ख्वाजाला सहज बाऊंड्री मिळाली. राहुलला मैदानात बॉल कुठल्या दिशेला चाललाय, तेच जज करता आलं नाही. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्यादिवशी ही घटना घडली.

मैदानातच डोळा लागला की काय

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्याडावातील सहावी ओव्हर सुरु होती. रविंद्र जाडेजा बॉलिंग करत होता. त्याने फ्लाइटेड चेंडू टाकला. ख्वाजाने मिडविकेटच्या दिशेने फटका खेळला. राहुल डीप मिडविकेटला उभा होता. बाऊंड्री त्याला रोखता आली असती. पण चेंडू डाव्या बाजूला आहे, हेच त्याला समजलं नाही. तो फक्त चेंडूला सीमारेषेपार जाताना पाहत राहिला. त्यावरुन केएल राहुलचा मैदानातच डोळा लागला की काय अशी चर्चा सुरु झालीय.


पुढच्याच चेंडूवर जाडेजाने काढली विकेट

सुदैवाने जाडेजाने पुढच्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाला बाद केलं. श्रेयस अय्यरने त्याची जबरदस्त कॅच घेतली. उस्मान ख्वाजा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण त्याला भारत दौऱ्यात अजून अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. दुसऱ्यादिवस अखेर ऑस्ट्रेलियाकडे 62 धावांची आघाडी आहे. ट्रेव्हिस हेड 39 आणि मानर्स लाबुशेन 16 धावांवर खेळतोय.

अक्षर पटेलचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या. टीम इंडियाचा पहिला डाव 262 धावांवर आटोपला. टीम इंडियाला फक्त 1 रन्सची नाममात्र आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या नाथन लायनने भारताच्या डावाल खिंडार पाडलं. त्याने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्याच्या ऑफ स्पिन गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे बॅट्समन फार काही करु शकले नाहीत. त्यांनी शरणागती पत्करली. भारताकडून अक्षर पटेलने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला. त्याने 115 चेंडूत 74 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 262 पर्यंत पोहोचता आलं.