IND vs AUS 3rd Test : इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 76 धावांची गरज आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी हे लक्ष्य़ खूपच सोपं आहे. पराभव टाळण्यासाठी टीम इंडियाला सर्वोच्च दर्जाच प्रदर्शन कराव लागेल. ऑस्ट्रेलिया ही काही नामीबिया, हॉलंडची टीम नाही. पूर्णपणे व्यावसायिक दिग्गज खेळाडूंनी भरलेली ही टीम आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडियाला सर्वोत्तम दर्जाच क्रिकेट खेळाव लागेल. टीम इंडियासाठी सध्या जी गोष्ट अशक्य वाटतेय, ती फक्त एक एक गोलंदाज साध्य करु शकतो. त्याचं नाव आहे, रविचंद्रन अश्विन. यासाठी अश्विनला एक दिवस जुना रेकॉर्ड मोडावा लागेल.
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
इथे एक दिवस जुन्या रेकॉर्डचा अर्थ नाथन लेयॉनच्या भारताच्या दुसऱ्याडावात केलेल्या कामगिरीशी आहे. गुरुवारी नाथन लेयॉनने दुसऱ्या डावात टीम इंडियाचे 8 विकेट काढून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये नाथन लेयॉनच्या नावावर आता 113 विकेट आहेत. या बाबतीत त्याने अनिल कुंबळेचा 111 विकेट्सचा रेकॉर्ड मोडला.
अश्विनच्या नावावर किती विकेट?
आज अश्विनकडे नाथन लेयॉनने एकदिवस आधी केलेला रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. असं झाल्यास भारतासाठी जी गोष्ट अशक्य वाटतेय, ती शक्य होऊ शकते. आता रेकॉर्ड तोडण्यासाठी अश्विनला काय कराव लागेल? सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विनच्या नावावर 106 विकेट आहेत. म्हणजे नाथन लेयॉनचा 113 विकेटचा रेकॉर्ड तोडण्यापासून तो 8 विकेट दूर आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्याडावात अश्विनला 8 विकेट काढाव्या लागतील, तरच भारताचा पराभव टळू शकतो.
फिरकी गोलंदाजांनी कमाल दाखवावी
याआधी नागपूर आणि दिल्ली कसोटी तीन दिवसात निकाली निघाली होती. आता इंदोर कसोटी सुद्धा तीन दिवसातच निकाली निघणार आहे. आतापर्यंत या टेस्ट सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाचा डाव एका सेशनमध्ये संपल्याच दिसून आलाय. त्यांचे धडाधड विकेट गेल्यात. आज सुद्धा असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांना कमाल दाखवावी लागेल.