IND vs AUS 3rd Test :टीम इंडिया इंदोरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामना जिंकू शकते. बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला हा तिसरा कसोटी सामना आहे. हा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला तीन कामं कराव लागतील. हे तीन फॅक्टर इंदोरमध्ये टीम इंडियासाठी चमत्कार करु शकतात. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्याडावात अर्धशतक झळकवलं. मात्र, तरीही टीम इंडिया नाथन लियॉनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकली. 64 धावात त्याने 8 विकेट काढल्या. टीम इंडियाचा दुसरा डाव 163 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाला आज कसोटीच्या तिसऱ्यादिवशी विजयासाठी फक्त 76 धावांची गरज आहे.
हरणारी मॅच जिंकू शकते टीम इंडिया
ऑस्ट्रेलिया आज विजयी लक्ष्य गाठून जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. स्पिनला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर टीम इंडियाच काही चाललं नाही. एकटा चेतेश्वर पुजारा (59) सोडल्यास, कोणीही खेळपट्टीवर टिकून लियॉनचा सामना केला नाही. नाथन लियॉनने या सामन्यात 99 धावा देऊन 11 विकेट काढल्या. पुजाराशिवाय श्रेयस अय्यरने (26) धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी खराब फटक्यांची निवड केली.
या तीन फॅक्टरकडे विजयाची ‘चावी’
जडेजा, अश्विन आणि अक्षर
इंदोर टेस्टमध्ये टीम इंडियाला हरणारी मॅच जिंकायची असेल, तर दुसऱ्याडावात रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेलची फिरकी चालली पाहिजे. ऑस्ट्रेलियाने वर्ष 2020 मध्ये एडिलेड कसोटीच्या दुसऱ्याडावात टीम इंडियाला 36 रन्सवर ऑलआऊट केलं होतं. टीम इंडियाला अशीच कमाल दाखवावी लागेल. इंदोर टेस्टच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट फक्त 11 धावात गमावल्या होत्या.
अतिरिक्त धावा रोखणं गरजेच
इंदोर कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 22 एक्स्ट्रा धावा दिल्या. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या डावात 9 बाय, 8 लेग बाय आणि 5 नो बॉलच्या रुपात एक्स्ट्रा रन्स दिल्या. दुसऱ्याडावात टीम इंडियाला अशा चूका टाळाव्या लागतील. अन्यथा अर्ध्यातासात मॅच संपेल.
DRS चा हुशारीने वापर
इंदोर टेस्टच्या पहिल्या डावात टीम इंडियाने DRS चा वापर केला. पण अनेकदा अपयश आलं. या टर्निंग पीचवर काही ना काही होणारच. टीम इंडियाला दुसऱ्याडावात हुशारीने DRS चा वापर करावा लागेल. पहिल्या डावात टीम इंडियाने आपले तीन रिव्यू गमावले होते.