IND vs AUS 4th Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात भारत-ऑस्ट्रेलियाच्या स्पिनर्सचा दबदबा दिसून आला होता. चर्चा फक्त त्यांचीच होती. कमालीची बॉलिंग असो किंवा टर्न दोन्ही टीम्सच्या स्पिन बॉलर्सची चर्चा होती. मात्र, अस असतानाही टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी या सीरीज दरम्यान आपला प्रभाव दाखवून दिलाय. खासकरुन मोहम्मद शमी आणि उमेश यादव. इंदोर टेस्टमध्ये उमेश यादवने आपल्या रिव्हर्स स्विंगची जादू दाखवली होती. काल अहमदाबाद टेस्टच्या पहिल्या दिवशी मोहम्मद शमीने तेच करुन दाखवलं.
बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात आपल्या बॉलिंगचा दम दाखवून देणाऱ्या शमीला तिसऱ्या इंदोर कसोटीत विश्रांती देण्यात आली होती. गुरुवारी 9 मार्चपासून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु झालेल्या सीरीजच्या शेवटच्या कसोटी सामन्यात शमीचा टीममध्ये समावेश करण्यात आलाय. ज्या प्रदर्शनाची शमीकडून अपेक्षा होती, तशीच कामगिरी त्याने करुन दाखवली आहे.
शमीचा तो घातक चेंडू
इनिंगच्या सुरुवातीला शमीला लय पकडण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण सेशन संपायच्या आधी त्याने पुनरागमन केलं. मार्नल लाबुशेनची विकेट त्याने काढली. शमीच्या चेंडूवर लाबुशेनच्या बोल्ड झाला. शमीने त्याचा खरा धमाका तिसऱ्या सेशनमध्ये दाखवला. हा विकेट खरोखरच खूप अप्रतिम होता.
As good as it gets! ??@MdShami11 uproots the off-stump to dismiss Handscomb for 17! ??
Australia 170/4.
Follow the match ▶️ https://t.co/8DPghkx0DE#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/2hXFYhvslW
— BCCI (@BCCI) March 9, 2023
स्टम्प 10 मीटर लांब पडला
शमीच्या रिव्हर्स स्विंगने कमाल केली. पीटर हँडसकॉ़म्बचा बचाव थिटा पडला. शमीचा चेंडू आता आला. थेट ऑफ स्टम्प उडवला. स्टम्प लेग साइडला 10 मीटर लांब जाऊन पडला.
पहिल्या दिवसाच्या खेळावर ऑस्ट्रेलियाचा दबदबा
शमीचा हा अप्रतिम चेंडू होता. हा विकेट पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांनी एकच जल्लोष सुरु केला. या चेंडूमधून शमीच्या गोलंदाजीतील दाहकता दिसून आली. काल पहिल्यादिवशी विकेटसाठी संघर्ष करणाऱ्या टीम इंडियाला हँडसकॉम्बच्या विकेटने थोडा दिलासा दिला. शमीने भारतासाठी पहिल्यादिवशी सर्वाधिक 2 विकेट घेतले. ऑस्ट्रेलियन ओपनर उस्मान ख्वाजाच्या दमदार शतकाच्या बळावर पाहुण्यांनी पहिल्यादिवस अखेर 4 बाद 255 धावा केल्या. आज दुसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाकडे वर्चस्व गाजवण्याची संधी आहे.