IND vs AUS : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाच्या एका खेळाडूपासून ऑस्ट्रेलियाला सर्वात जास्त धोका

| Updated on: Mar 06, 2023 | 9:26 AM

IND vs AUS : ऑस्ट्रेलियावर हा खेळाडू भारी पडेल. कारण नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याचा रेकॉर्डच तसा आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.

IND vs AUS : नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाच्या एका खेळाडूपासून ऑस्ट्रेलियाला सर्वात जास्त धोका
ind vs aus
Image Credit source: PTI
Follow us on

IND vs AUS 4 th Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. हा कसोटी सामना 9 मार्चपासून सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर मुख्य आव्हान अक्षर पटेलच असेल. अक्षर पटेलने या सीरीजमध्ये बॉलने विशेष कमाल दाखवलेली नाही. टीम संकटात असताना त्याने आपल्या बॅटिंगची क्षमता दाखवून दिली. चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन टीमसमोर अक्षरच्य़ा फिरकी गोलंदाजीच आव्हान असेल. कारण या मैदानावर अक्षरची कामगिरीच तशी आहे. अक्षरने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 2 कसोटी सामन्यात आतापर्यंत 20 विकेट घेतले आहेत.

फक्त सीरीज जिंकणच टीम इंडियाच लक्ष्य नसेल

तिसरी इंदोरची टेस्ट मॅच जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. टेस्ट सीरीज 2-2 बरोबरीत सोडवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. टीम इंडियासाठी फक्त सीरीज जिंकण्यापुरता या सामन्याच महत्त्व नाहीय. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेशासाठी ही टेस्ट मॅच जिंकावीच लागेल. चौथ्या कसोटीत अक्षर पटेल टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

3 टेस्ट मॅचमध्ये कशी आहे त्याची कामगिरी?

नागपूर ते इंदोर टेस्ट अक्षर पेटलने चेंडूने विशेष कमाल दाखवलेली नाही. पण त्याने दमदार बॅटिंग केलीय. बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या 3 टेस्ट मॅचमध्ये अक्षर पटेलने 185 धावा केल्या आहेत. या सीरीजमध्ये त्याला फक्त एक विकेट मिळालीय. अहमदाबाद टेस्टमध्ये तो वेगळ्या लेव्हलच प्रदर्शन करु शकतो. कॅप्टन रोहित शर्माच्या भात्यातील तो सर्वात घातक अस्त्र ठरु शकतो.

अहमदाबादमध्ये काढल्या 20 विकेट

अहमदाबादच नरेंद्र मोदी स्टेडियम अक्षर पटेलच होम ग्राऊंड आहे. इथे त्याने 2 टेस्ट मॅचमध्ये 20 विकेट काढल्यात. यात 11 विकेट त्याने एकाच टेस्ट मॅचमध्ये काढल्यात. पहिल्याडावात 6 आणि दुसऱ्याडावात 5 विकेट काढल्या होत्या. अक्षर पटेल मागच्यावर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंड विरुद्ध या दोन्ही कसोटी सामन्यात खेळला होता. यात एक कसोटी सामना डे-नाइट होता. 2 दिवसात हा कसोटी सामना संपला.