अहमदाबाद | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटीत टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याने शानदार शतक पूर्ण केलंय. विराटने तब्बल 241 बॉलमध्ये हे झुंजार शतक ठोकलंय.या खेळीत त्याने फक्त 5 चौकार ठोकले. विराटने जवळपास कसोटी क्रिकेटमध्ये 3 वर्षांनी हे शतक ठोकलंय. विराटचं कसोटीमधील हे 28 वं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वं शतक ठरलंय.
विराट गेल्या काही काळापासून सातत्याने फॉर्मसह झगडत होता. त्याला धावा करण्यसााठी संघर्ष करावा लागत होता. मात्र आता विराटला सूर गवसलाय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया अडचणीत असताना विराटने खिंड लढवली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराटने अर्धशतक ठोकलं.त्यानंतर आता चौथ्या दिवशी शतक पूर्ण केलं. विराटने शतक ठोकल्यानंतर बॅट उंचावून सेलिब्रेशन केलं. तसेच स्टेडियममधील सर्व चाहते उभे राहून विराटचं अभिनंदन केलं. विराटचं हे भारतातील 35 वं शतक ठरलंय.
तसेच विराट या शतकासह ऑस्ट्रेलिया विरुद्ध संयुक्तरित्या सर्वाधिक शतकं करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 11 शतक ठोकले आहेत. तर आता विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 वं कसोटी शतक ठोकत सुनील गावसकर यांची बरोबरी केली.
विराट कोहली याचं 28 वं कसोटी शतक
CENTURY for @imVkohli ??
He's battled the heat out here and comes on top with a fine ?, his 28th in Test cricket. #INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/i1nRm6syqc
— BCCI (@BCCI) March 12, 2023
विराटने तिसऱ्या दिवशी 29वं कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. त्या अर्धशतकानंतर विराटने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. विराट ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणजेच कसोटी, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने विंडिजचा दिग्गज ब्रायन लारा याला पछाडत दुसरं स्थान मिळवंल. तसेच विराटचा भारतातील 50 वा कसोटी सामना आहे. आता विराटकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा टीम इंडियाला आहे.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.